Abhijeet Dipke: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव होताच, अभिजीत दिपके यांना का आली ज्ञानेश कुमार यांची आठवण?

Abhijeet Dipke on America Mid Term Election: मध्यावधी निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला. रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट होताना दिसत आहे. त्याच आधारे सीजेपी संयोजक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना उपरोधिक टोला हाणला आहे.

Abhijeet Dipke: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव होताच, अभिजीत दिपके यांना का आली ज्ञानेश कुमार यांची आठवण?
ट्रम्प यांचा पराभव, दिपके यांना का आली ज्ञानेश कुमार यांची आठवण?
| Updated on: Nov 04, 2026 | 12:19 PM

Abhijeet Dipke on Donald Trump Gyanesh Kumar: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे परिणाम राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी धक्कादायक ठरले आहेत. वरिष्ठ सभागृह अर्थात सिनेटसाठीच्या खासदारांसाठी होणाऱ्या निवडणुकीने ट्रम्प यांच्या खुर्चीलाच सुरूंग लागण्याची भीती व्यक्त होत आहे. आता या निवडणुकीच्या निकालाचे भारतातही पडसाद उमटले आहेत. सीजेपी संयोजक अभिजीत दिपके यांनी या निकालावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार यांना जोरदार उपरोधिक टोला हाणला आहे.

ज्ञानेश कुमार असते तर ट्रम्प हरले नसते

Loading...

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या हातून अनेक जागा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांची धुळधाण झाली आहे. पराभवाचा सामना रिपब्लिकन पार्टीला करावा लागत आहे. त्यावरून अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर ज्ञानेश कुमार यांना उपरोधिक टोला हाणला.

” जर अमेरिकेच्या निवडणुकीत ज्ञानेश कुमार असते, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव कधीच झाला नसता.” असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला. देशातील निवडणूक आयोगाचा कारभार आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील वातावरणाचा संदर्भ घेत दिपके यांनी हा आसूड ओढला आहे. दिपके यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

निवडणूक आयुक्तांकडे दिपकेंचा रोख

गेल्या काही महिन्यांपासून अभिजीत दिपके, कॉकरोच जनता पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. विशेष सखोल पुनरिक्षण, मतदार याद्यातून अनेकांनी नावं वगळणं, SIR प्रक्रियेतील कथित गडबडीवरून जोरदार आंदोलन सुरू केले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी करण्यात येत आहे. निवडणूक आयोग हा भाजपसाठी काम करत असल्याचा इंडिया आघाडीने गंभीर आरोप केला आहे. त्यातूनच अभिजीत दिपके यांनी हा जोरदार निशाणा साधला आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचा डंका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यवधी निवडणुकीतील निकाल स्वीकारले आहेत. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाने सिनेट आणि गव्हर्नर पदासाठीच्या निकालात मोठे यश मिळवले आहे. डेमोक्रेटिक पक्षाने टेक्सॉस, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, ओहायो आणि इतर ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसर्‍या बाजूला रिपब्लिकन पक्षाला अनेक ठिकाणी पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us