CJP : अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचा नवा धक्कादायक दावा… थेट ट्विट करत जे घडलं तेच…

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या 'स्कूल ठीक करो' मोहिमेअंतर्गत नागपूरमधील सरकारी शाळांतील धक्कादायक दुरवस्था समोर आली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छता, दारू-अमली पदार्थांचे सेवन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे शिक्षण व्यवस्था धोक्यात असल्याचे CJP ने म्हटलं.

CJP : अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचा नवा धक्कादायक दावा... थेट ट्विट करत जे घडलं तेच...
सीजेपीचा मोठा दावा
| Updated on: Sep 02, 2026 | 7:39 PM

कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची (CJP) ची देशभरात चर्चा असून सध्या त्यांचं ‘स्कूल ठीक करो’ हे कँपेन सुरू आहे. मात्र आता सीजेपीने नागपूरमधील सरकारी शाळांच्या दुरवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. स्कूल ठीक करो याच मोहिमेअंतर्गत सीजेपीने नागपूरमधील सरकारी शाळांमध्ये असलेला मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. एवढंच नव्हे तर काही शाळांच्या परिसरात दारू आणि अमली पदार्थांचे सेवन केलं जात असल्याचा दावा सीजेपीने केला आहे. या संदर्भात सीजेपीने सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलंय ?

X (पूर्वीचं ट्विटर) केलेल्या एका पोस्टमधून सीजेपीने शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘शाळेच्या आत दारूला परवानगी आहे, पण त्याची चौकशी केली असता सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते?’ असा थेट सवाल या पोस्टमधून विचारण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

एवढंच नव्हे तर अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचीही कमतरता आहे, असा दावाही CJP ने केला आहे. अस्वच्छ आणि वापरण्यायोग्य नसले ली वॉशरूम्स, पिण्याच्या पाण्याची कमतरता , असुरक्षित अन्नपदार्थ आणि धड क्लासरूमही नाहीत, त्यांची कमतरता आहे, अशा समस्यांकडे सीजेपीने या पोस्टमधून लक्ष वेधलं.

 

आणखी काय आरोप ?

याच पोस्टमधून सीजेपीने आणखीही काही आरोप केले आहेत. वर्गखोल्यांची संख्या अपुरी असल्यामुळे वेगवेगळ्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवावं लागतं, असाही आरोप करण्यात आला. एवढंच नव्हे तर सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत 5 वीची गुणपत्रिकाही मिळालेली नाही, असा दावा सीजेपीने केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ माजली आहे. ‘अशा परिस्थितीतील मुलांना शाळेत पाठवयाचं तरी कसं ?’ असा थेट सवाल CJP ने उपस्थित केला आहे.

काय आहे ‘स्कूल ठीक करो’ मोहीम ?

CJP ची ‘स्कूल ठीक करो’ ही मोहीम केवळ नागपूरपुरती मर्यादित नाही. सरकारी शाळांमधील समस्यांची नोंद करून त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने ही मोहीत सुरू करण्यात आली आहे. CJP संस्थापक अभिजीत दिपके यांनी 15 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव संटुक पिंपरी येथून या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेद्वारे नागरिक, पालक, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना सरकारी शाळांची पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us