Abhijeet Dipke : हे जंतर-मंतर नाही, इथे ही नाटकं चालणार नाहीत; अभिजीत दीपकेंना पार्कमधून चक्क हाकललं

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांच्या टीम मेंबर्सना दिल्लीतील एका पार्कमधून लोकांनी चक्क हाकललं. ते काही समर्थकांसह येथे ‘जंतर-मंतर सीझन 2’ची योजना तयार करण्यासाठी जमले होते. मात्र त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आलं.

Abhijeet Dipke : हे जंतर-मंतर नाही, इथे ही नाटकं चालणार नाहीत; अभिजीत दीपकेंना पार्कमधून चक्क हाकललं
सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके
| Updated on: Aug 13, 2026 | 10:10 AM

कॉकरोच जनता पार्टीची (CJP) स्थापना आणि जंतरमंतरवरील आंदोलन यामुळे देशभरातील घराघरांत पोहोचलेलं नावं म्हणजे अभिजीत दीपके (Abhijeet Dipke ). सध्या ‘जंतर-मंतर सीझन 2’ च्या तयारीत आहेत, मात्र त्याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. खरंकतर दिल्लीतील एका निवासी सोसायटीच्या पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) बैठकीला सुरुवात होताच वातावरण अचानक तापलं. ‘जंतर-मंतर सीझन 2’ची रणनीती आखण्यासाठी संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांच्याया टीममधील सौरभ दास, आशुतोष रंका आणि काही समर्थकांसह त्या पार्कमध्ये पोहोचले होते. मात्र सोसायटीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी पार्कमध्ये धाव घेतली आणि ही मीटिंग घेण्यास तीव्र विरोध केला. “हे सोसायटीचं पार्क आहे, आंदोलनाची जागा नाही. इथे कोणतीही नौटंकी चालणार नाही,” असं म्हणत रहिवाशांनी CJPच्या कार्यकर्त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. अखेर अभिजीत दीपके आणि त्यांच्या समर्थकांना पार्कमधून बाहेर पडावं लागलं.

हॉल मिळाला, पण शेवटच्या क्षणी बैठक रद्द

या घटनेपूर्वी दीपके यांनी दिल्लीतील बैठकीसाठी जागा मिळवताना अडचणी येत असल्याचा दावा केला होता. स्वयंसेवकांसोबत बैठक घेण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी हॉल शोधले; मात्र कुठेही जागा मिळत नव्हती, असं त्यांनी म्हटलं होतं.
काही ठिकाणी व्यवस्थापनाने “वरून दबाव आहे” असं सांगत CJPला हॉल देण्यास नकार दिला, असा दावा दीपके यांनी केला. अखेर त्यांना एका ठिकाणी हॉल मिळाला आणि त्याची पावतीही त्यांनी दाखवली. मात्र दुसऱ्याच दिवशी हॉल देणाऱ्यांनीही बैठक घेण्यास नकार दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हॉल उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींना धमकावण्यात आलं आणि CJPची बैठक होऊ दिली गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती दाखवण्यात आली, असा आरोप दीपके यांनी केला

मीटिंग घेण्यापासून आम्हाला रोखलं जातंय

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या दबावामुळे CJPला बैठक घेण्यासाठी जागा मिळू दिली जात नाही.“लोकांना घाबरवलं आणि धमकावलं जात आहे. आम्हाला मीटिंग घेण्यापासून रोखलं जात आहे,” असा दावा दीपके यांनी केला. इनडोअर हॉलमध्ये बैठक घेण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक नसल्याचंही दीपकेंनी सांगितलं.

इथे काही नौटंकी चालणार नाही

हॉलची व्यवस्था न झाल्याने CJPच्या नेत्यांनी शेवटी एका निवासी सोसायटीच्या पार्कचा पर्याय निवडला. समर्थकांसोबत बैठक सुरू झाली आणि ‘जंतर-मंतर सीझन 2’च्या पुढील रणनीतीवर चर्चा सुरू झाली. याचदरम्यान दीपके यांनी समर्थकांना विचारलं, “आता कोणाचा राजीनामा हवा?” त्यांवर मोदींचा असं उत्तर मिळालं. मात्र याचदरम्यान मीटिंगची माहिती सोसायटीच्या लोकांना कळली आणि मोठ्या संख्येने रहिवासी त्या पार्कमध्ये पोहोचले. त्यानंतर वातावरण अधिकच तापलं आणि बैठकीला विरोध सुरू झाला. इथे काही नौटंकी चालणारी नाही, असे रहिवाश्यांनी त्यांना सुनावलं. काही वेळाने पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर CJPच्या नेत्यांना आणि समर्थकांना पार्कमधून निघावं लागलं.

दरम्यान, CJPने पुढील काळात देशव्यापी ‘लिसनिंग टूर’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांच्या म्हणण्यानुसार, या दौऱ्यात देशभरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
शिक्षणाचा मुद्दा या अभियानाच्या केंद्रस्थानी असेल, असंही त्यांनी सांगितलं. पालक आणि नागरिकांनी सरकारी शाळांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा सोशल ऑडिट करावा, समस्या नोंदवाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन CJPकडून करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us