कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण; तरुणांच्या घोळक्यात कुख्यात गुंड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्लीतील नीट पेपरफुटीवरून सुरू असलेलं आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनात दिल्लीतील कुख्यात गुंड देखील सामील झाल्याचे समोर आलं आहे.

कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण; तरुणांच्या घोळक्यात कुख्यात गुंड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
| Updated on: Jul 23, 2026 | 8:19 AM

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवरवरील कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन पेटलं आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री कॉक्रोच जनता पक्ष आणि पोलीस आमने-सामने आले. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवी दिल्लीत हिंसक वळण लागलेल्या आंदोलनात दिल्लीतील कुख्यात गुंड देखील सामील झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कुख्यात गुंड देखील आंदोलनात शिरू लागल्याने कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नवी दिल्लीच्या 20 जुलै रोजीच्या आंदोलनात ईशान्य दिल्लीतीलग कुख्यात गुंड हाजी अफझल याने देखील सहभाग नोंदवल्याचे समोर आला आहे. त्याचा आंदोलन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुंड हाजी अफझल देखील आंदोलकांसोबत घोषणाबाजी करताना दिसत आहे. हाजी अफजलची पत्नी हज्जन शकीला या आम आदमी पक्षाच्या नगरसेविका आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, हाजी अफझलवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, आर्म्स अॅक्ट, मारहाण, डीपीडीपी कायदा आणि मकोका सारखे 26 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शेवटचा गुन्हा डीपीडीपी अंतर्गत दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात सीलमपूर पोलीस स्टेशनमध्ये डीपीडीपी कायद्यांतर्गत कलम 3 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

त्याच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर 28 ऑगस्ट 2013 दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर शिक्षा देखील सुनावली होती. हाजी अफझल आतापर्यंत विविध गुन्हा शिक्षा भोगून आला आहे. तर त्याची अनेक प्रकरणातून सुटका देखील झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईशान्य दिल्लीत अनेक गुंडांना अफझलचा पाठिंबा असल्याचाही आरोप आहे. त्याच्या भावावर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अफझलसारखा गुंड आंदोलनात सामील झाल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवी दिल्लीत 20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनात त्याची काय भूमिका होती, याचा तपास करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे अफझल केवळ आंदोलनात सामील होता, असाही दावा केला जात आहे.

तत्पूर्वी, नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पक्षाने 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांचा मार्ग रोखून धरला होता. त्यावेळी दिल्ली पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले होते. त्यात 118 पोलीस जखमी झाले होते. तर अनेक वरिष्ठ अधिकारी जखमी झाले होते.

Follow Us