डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात आमदार, खासदारामध्ये जोरदार राडा; थेट एकमेकांना भिडले, वाद मिटवताना मंत्र्याला फुटला घाम

मोठी बातमी समोर येत आहे, डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आमदार आणि खासदारामध्ये जोरदार राडा झाला आहे. शेवटी मंत्र्याच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण शांत झालं, मात्र यामुळे मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात आमदार, खासदारामध्ये जोरदार राडा; थेट एकमेकांना भिडले, वाद मिटवताना मंत्र्याला फुटला घाम
आमदार, खासदारामध्ये जोरदार राडा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 5:29 PM

तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला मोठं यश मिळालं. पक्ष नवा असताना देखील टीव्हीकेनं डीएमके आणि एआयएडीएमके सारख्या प्रस्थापीत पक्षांना पराभवाची धूळ चारली. मात्र तरी देखील टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळालेलं नव्हतं. टीव्हीकेनं काँग्रेस आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षाच्या पाठिंब्यावर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली. थलपती विजय हे मुख्यमंत्री बनले. परंतु आता याच तामिळनाडूमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तामिळनाडूत दीपप्रज्वलनावरून खासदार आणि आमदारामध्ये जोरदार राडा झाला आहे. थेट व्यासपीठावरच खासदार आणि आमदार एकमेकांना भिडल्याचं पाहयला मिळालं. यामुळे राज्यात हा चांगलाच चर्चेला विषय बनला आहे.

टीव्हीकेचे आमदार नवलपट्टू विजी आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार क्रिस्टोफर तिलक यांच्यामध्ये दीपप्रज्वलनावरून जोरदार राडा झाला आहे. त्यानंतर हे प्रकरण एवढं वाढलं की, टीव्हीकेचे आमदार नवलपट्टू विजी यांनी खासदार क्रिस्टोफर तिलक यांच्या हातामधील मेनबत्ती थेट व्यासपीठावर खाली पाडली.या घटनेमुळे काही काळ व्यासपीठावर मोठा तणाव पहायला मिळाला, या कार्यक्रमाला विजय थलपती यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एस. रमेश हे देखील उपस्थित होते, अखरे त्यांनी पुढाकार घेत या दोघांमध्ये मधस्थी घडून आणली, दोघांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

Loading...

त्रिचीमध्ये ‘एकात्मिक बाल विकास सेवा’ (ICDS) द्वारे सामूहिक डोहाळे जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री एस. रमेश यांच्यासोबतच थिरुवेरुम्बुरचे टीव्हीकेचे आमदार नवलपट्टू विजी आणि काँग्रेसचे खासदार क्रिस्टोफर तिलक यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात हा राडा झाला आहे. दीपप्रज्वलनावरून खासदार आणि आमदार भिडले, शेवटी मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झालं.

कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार दीपप्रज्वलनाची संधी टीव्हीकेचे आमदार नवलपट्टू विजी यांना न मिळाल्याने त्यांचा चांगलाच संताप झाला, त्यानंतर मीच आधी दीपप्रज्वलन करणार यावरून ते थेट काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदाराला भिडले यावरून व्यसापीठावर काही काळ चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us