Shahana Goswami : माझे अनेकांसोबत रिलेशनशिप्स, काहींशी शारीरिक संबंध, तर काहींसोबत…बॉलिवूड अभिनेत्रीचा बेधडक खुलासा
Bollywood Actress : बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं तिच्या रिलेशनशिप्सबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिची काहींसोबत मैत्री असते तर काहींसोबत शारीरिक संबंध असतात.

अभिनेत्री शहाना गोस्वामीनं एका मुलाखतीत तिच्या अफेअरबद्दल खुलासा केला होता. अभिनेत्रीनं सांगितलं की ती अनेक ‘ओपन रिलेशनशिप’मध्ये आहे. मात्र, तिच्यासाठी यापैकी कोणतंही नातं कॅज्युअल नव्हतं, असं सुद्धा अभिनेत्रीनं सांगितलं. काही केवळ मैत्रीपुरते असतात, तर काही शारीरिक संबंधांमध्ये बदलतात. शहाना गोस्वामी म्हणाली की, ‘सध्या माझा कोणी पार्टनर नाही. माझे असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासोबत माझे दीर्घकाळपासून संबंध आहेत, पण ते प्रासंगिक नाहीत. आपल्या सर्वांचे अनेक मित्र असतात, प्रत्येक मैत्री वेगळी असते.’
‘कधीकधी ती केवळ मैत्री असते. तर कधीकधी त्याचं रूपांतर शारीरिक संबंधांमध्येही होतं. या नात्याला एखाद्या विशिष्ट दिशेनंच वळवण्याची काहीच गरज नसते. मुख्य मुद्दा अगदी साधा आहे, प्रेम आणि मैत्री. मित्र म्हणजे अशी व्यक्ती, जिच्याबद्दल तुमच्या मनात प्रेम असतं.’
शहानानं ‘ओपन रिलेशनशिप्स’मधील ‘घोस्टिंग’बद्दलही आपलं मत मांडलं. ती म्हणाली, ‘खरं तर, तसं सहसा घडत नाही. म्हणजे, मी तरी कोणालाही घोस्ट करत नाही, पण मुळातच तशी परिस्थिती उद्भवत नाही. याचं कारण असं की, जेव्हा तुम्ही नात्यात इतकं मोकळेपणानं वावरता, तेव्हा गोष्टी अचानक किंवा अकस्मातपणे संपत नाहीत, याची मलाही जाणीव आहे.’
View this post on Instagram
प्रेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
प्रेमाबद्दल बोलताना शहाना म्हणाली की, ‘मालकी हक्काची भावना, प्रेम म्हणजे एकाच व्यक्तीचे पूर्णपणे आणि केवळ त्याच व्यक्तीचे होऊन जाणे, ही समजूत इतकी खोलवर रुजलेली आहे की, या विशिष्ट समजूतीनुसार वेगळं दिसणारं नातं अनेकांना चुकीचंच वाटतं. मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, प्रेम हे मुक्त करणारे असावं, ते संबंधित व्यक्तींवर निर्बंध घालणारं किंवा त्यांना बंधनात अडकवणारं ठरू नये.’ सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शहाना बोलत होती.
दरम्यान, शहाना गोस्वामीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिनं संतोष, डिसपॅच, झ्विगिटो, बॉम्बे बेगम, फॉर युअर्स, अ सुटेबल बॉय यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
