कुंभमेळ्यात मुस्लिमांना प्रवेश नको, विश्व हिंदू परिषदेकडून मोठी मागणी
नाशिकमधील कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ वर्मा यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी मागणी केली आहे. मुस्लिमांना कुंभमेळ्यात प्रवेश नको असं त्यांनी म्हटलं आहे.

नाशिकमधील कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ वर्मा यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी मागणी केली आहे. कुंभमेळ्यात मुस्लिमांना प्रवेश नको असं अलोकनाथ वर्मा यांनी म्हटलं आहे. हिंदू मंदिर, आश्रम हे पर्यटन स्थळं नाहीत, ही श्रद्धास्थाने आहेत. मक्कामध्ये बोर्ड लागले की इथे फक्त मुस्लिम येतील. त्यामुळे आमच्या धार्मिक स्थळांवर त्यांनी येणे योग्य नाही, असंही यावेळी अलोकनाथ वर्मा यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अलोकनाथ वर्मा?
कुंभमेळ्याचा मी आढावा घेतला साधू महंतांकडून रस्ते बनत आहेत, काही कामं सावधानतेणं होणे गरजेचे आहेत. कुंभमेळ्याला आता फक्त आठच महिने राहिले आहेत, त्यामुळे आता कामं लवकर पूर्ण व्हायला हवीत. काही ठिकाणी तर सर्वेक्षण पण नाही झाले, पैसे पण नाही मिळाले. सरकारी जागेवर काही आश्रम असतील तर ते तोडतील असे व्हायला नको. चक्रतीर्थाचा पूर्ण विकास व्हायला हवा. मास, मच्छी बाजार हटवला जावा, दारूची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
चक्रतीर्थावर जाऊन प्रसन्न वाटले, धर्मध्वज कार्यक्रम जनजातीजमातींसाठी जणू अर्पण केला आहे. सध्या जो काही आरोप सुरू आहे की जनजाती किंवा इतरांना वंचित ठेवले जाते त्यांना आज उत्तर मिळाले. अशोक सिंगल यांचे जनजन्मशताब्दी वर्ष असल्याने 1 करोड हितचिंतक आम्ही बनवणार आहोत. महाराष्ट्र सरकारने समान नागरिक कायदा बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्तराखंड, गुजरात आसाम पुढे गेले आहेत. महिला पुरुष समानता असली पाहिजे, पूर्ण विश्व आज एक पती एक पत्नी या सूत्रावर चालतंय. 3 महिन्यात 3 वेळा तलाक दिला तर ती महिला रस्त्यावर येते. पतीच्या मृत्यनंतर पतीचा हिस्सा पत्नीला मिळायलाच पाहिजे त्यासाठी कायदा आणायलाच पाहिजे. महाराष्ट्र यामध्ये सहभागी होईल ही आशा आहे. लालच देऊन धर्मांतर होत आहे, असा आरोपही यावेळी अलोकनाथ वर्मा यांनी केला.
