AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prasad Oak : दिग्दर्शन आणि अभिनयात छाप पाडल्यानंतर प्रसाद ओक यांचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण; नव्या सिनेमाची घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीवर अभिनयाची आणि दिगदर्शनाची छाप पाडल्यानंतर प्रसाद ओक आता हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणार आहे. नव्या सिनेमाची त्याने घोषणा केली असून. प्रसाद ओक यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Prasad Oak :  दिग्दर्शन आणि अभिनयात छाप पाडल्यानंतर प्रसाद ओक यांचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण; नव्या सिनेमाची घोषणा
prasad oak hindi debutImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 8:34 PM
Share

मराठी नाटकांपासून ते सिनेमांपर्यंत आपल्या अभिनयाचां आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवणारा अभिनेता प्रसाद ओक आता हिंदी चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवर विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रसाद ओक आता एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘सायबर – द बिगिनिंग ‘ असं आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून प्रसाद ओकला हिंदी सिनेमात कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

प्रसाद ओकने मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. फर्जंद, आणि….डॉ. काशिनाथ घाणेकर, स्माईल प्लीज, धुरळा आणि पिकासो यांसारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयाची वेगवेगळी रूपं दाखवली. मात्र धर्मवीर चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील विशेष गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.

अभिनयासोबतच प्रसादाने दिग्दर्शकाने म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाला 65 व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांचंही त्याने दिग्दर्शन केलं आहे.

सायबर – द बिगिनिंग’ मध्ये कोणकोणते कलाकार

या चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक नाईक करत असून राज झकेरियास यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. प्र्साद ओकसोबत या सिनेमात झैन खान दुर्रानी, तारे जमीन पर फेम दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग, राहूल सिंग,आलीशा खान, आयुष त्यागी, सौम्या श्रीवास्तव , अजित कोश्य आणि विठ्ठ्ल काळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गोपी सुंदर यांनी संगीत दिलं असून, अनिरुद्ध चॅटर्जी यांनी पटकथा लिहिली आहे.

प्रसाद ओकची भूमिका काय असणार ?

‘सायबर – द बिगिनिंग’ हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र प्रसाद ओक या सिनेमात कोणती भूमिका साकारणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घालणार प्रसाद हिंदी चित्रपटात कोणत्या नव्या अंदाजात दिसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू