AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी निधीची चणचण, पण गोकुळच्या चार संचालकांसाठी 80 लाखांची वकील फी; सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा

Mahayuti Government Pays Mukul Rohatgi ₹80 Lakh in Gokul Case: दुष्काळात शेतकऱ्यांसाठी निधीची चणचण होत आहे. पण गोकुळच्या चार संचालकांसाठी 80 लाखांची वकील फी दिली, असं म्हणत सतेज पाटलांनी सरकारला सवाल केला आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी निधीची चणचण, पण गोकुळच्या चार संचालकांसाठी 80 लाखांची वकील फी; सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा
Legal Fee Revealed, Satej Patil Targets Maharashtra Government
| Updated on: Nov 23, 2026 | 8:29 PM
Share

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या समर्थनार्थ न्यायालयात बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 80 लाख रुपये वकील फी दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांना राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ही फी देण्यात आल्याचे समजते. या खर्चाची माहिती समोर येताच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा मुद्दा न्यायालयात गेला होता. या नियुक्त्यांचे समर्थन करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. या कामासाठी त्यांना 80 लाख रुपये वकील फी देण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षासाठी सरकारी तिजोरीतून एवढा मोठा खर्च करण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या मुद्द्यावर सतेज पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी अडचणीत आहेत. दुसरीकडे विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरीतील 80 लाख रुपये खर्च करणे म्हणजे उधळपट्टी असल्याची टीका त्यांनी केली.

सतेज पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती सरकारकडून साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर केला जात आहे. चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल 80 लाख रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहेत, तर दुसरीकडे विकासकामांसाठी निधीची कमतरता जाणवत आहे.

अशा वेळी सरकारी पैशांचा वापर अशा प्रकरणांसाठी करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा मुद्दा आता केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता राजकीय वादाचा विषय बनला आहे. वकील फीच्या 80 लाखांच्या खर्चामुळे महायुती सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. या मुद्द्यावरून कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू