काँग्रेसने पुन्हा शड्डू ठोकला, ‘या’ राज्यात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार, पण…

| Updated on: May 25, 2023 | 12:36 AM

भाजप सरकारवर निशाणा साधत सीएम गेहलोत यांनी म्हटले आहे की, केवळ पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत, हेच कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले आहे.

काँग्रेसने पुन्हा शड्डू ठोकला, या राज्यात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार, पण...
Follow us on

जयपूर : राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीपर्यंत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे गेहलोत सरकारने पुन्हा एकदा राज्यात परतण्याची तयारी पूर्ण केली असल्याचा विश्वास त्यांनी लोकांना दिला आहे. त्यातच 26 मे रोजी दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची मोठी आणि महत्वाची बैठक होत आहे. राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या रणनीतीबाबत ही बैठक होत आहे. दिल्लीत होणाऱ्या या बैठकीबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या इतर बड्या नेत्यांसह अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

यावेळी अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, आमच्या पक्षात शिस्त आहे, आणि आमचा पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काय बोलणार आहेत त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर याच परिस्थितीला धरुन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कर्नाटक निवडणुकीचे उदाहरण देत. कर्नाटकातील नेत्यांवर ईडीकडून कसा छळ चालू होता हे सांगत त्यांनी तेथील उदाहरणही दिले आहे.

भाजप सरकारवर निशाणा साधत सीएम गेहलोत यांनी म्हटले आहे की, केवळ पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत, हेच कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले आहे.

त्यामुळे आमच्याकडे पैसाही नाही, पण जनता सर्व काही पाहत आणि स्पष्टपण बघत आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या अल्टिमेटमवर आणि मंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाला विश्वास देत सांगितले की, सगळ्यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली तर नक्की जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.