स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उमर अब्दुल्लांना पाहून पीएम मोदी आनंदीत, म्हणाले….

पीएम मोदींच्या या पोस्टआधी सीएम अब्दुल्ला यांनी साबरमती रिवरफ्रंटवरील आपले सकाळचे धावतानाचे फोटो पोस्ट केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र शासित प्रदेशात पर्यटनावर मोठा परिणाम झालाय.

स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उमर अब्दुल्लांना पाहून पीएम मोदी आनंदीत, म्हणाले....
PM Modi-cm omar abdullah
| Updated on: Aug 01, 2025 | 1:51 PM

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. त्याआधी त्यांनी रनिंग केली, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अब्दुल्ला यांच्या गुजरात दौऱ्यावर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. “उमर अब्दुल्ला यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा दौरा भारतीयांना देशाच्या विभिन्न भागात फिरण्यासाठी प्रेरणा देईल” असं पीएम मोदींनी म्हटलय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CM उमर अब्दुल्लाच्या सोशल मीडिया पोस्टला रिपोस्ट केलं. “कश्मीर ते केवडिया. उमर अब्दुल्ला यांना साबरमती रिवरफ्रंटवर पळताना आणि स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहताना पाहून खूप बरं वाटलं. त्यांचा हा दौरा एकतेचा संदेश आहे. भारतीयांना देशाच्या विविध भागात फिरण्यासाठी यातून प्रेरणा मिळेल” असं पंतप्रधान मोदींनी लिहिलय.

सर्वात सुंदर जागांपैकी ही एक जागा

पीएम मोदींच्या या पोस्टआधी सीएम अब्दुल्ला यांनी साबरमती रिवरफ्रंटवरील आपले सकाळचे धावतानाचे फोटो पोस्ट केले होते. “मी एका पर्यटन कार्यक्रमासाठी अहमदाबदाला आलेलो. त्याचा फायदा उचलला. साबरमती रिवरफ्रंटवर सकाळी धावण्यासाठी आलो. मी रनिंग केलेल्या सर्वात सुंदर जागांपैकी ही एक जागा आहे. अन्य वॉकर/रनर सोबत हे फोटो शेअर करताना आनंद होत आहे. मी अद्भुत अटल फुट ब्रिज जवळूनही रनिंग केलं” अशी पोस्ट उमर अब्दुल्ला यांनी केली होती.


‘नव्या भारताची’ मोठी ओळख आहे

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्टॅच्यू ऑफ यूनिटीला पाहून म्हणाले की, “मी कल्पनाच केली नव्हती की, ही प्रतिमा इतकी भव्य असेल. सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना आपण ‘आयरन मॅन ऑफ इंडिया’ च्या नावाने ओळखतो. ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. ही एका ‘नव्या भारताची’ मोठी ओळख आहे” असं ते म्हणाले.


मी इथे निराश होऊन आलेलो नाही

“पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र शासित प्रदेशात पर्यटनावर मोठा परिणाम झालाय. पण उद्योगाशी संबंधित लोक बेरोजगार नाहीयत” असं उमर अब्दुल्ला म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अब्दुल्ला दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. “मी इथे निराश होऊन आलेलो नाही. फक्त एवढीच इच्छा आहे की, जास्तीत जास्त लोकांनी काश्मीरला यावं. त्यामुळे कोणी गैरसमज करु नये. लाखो लोक वैष्णो देवी यात्रा आणि अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरमध्ये आले आहेत” असं उमर अब्दुल्ला म्हणाले.