जबरा फॅन! योगी आदित्यनाथांना एवढा पूजतो की… जणू त्यांच्या प्रतिमेत राम पाहतो, बघा काय केलंय याने…

| Updated on: Sep 19, 2022 | 11:51 AM

राजकीय नेत्यांचे समर्थक काही कमी नसतात, पण योगी आदित्यनाथांच्या समर्थकांसारखे भक्त कुठेच पाहायला मिळणार नाहीत...

जबरा फॅन! योगी आदित्यनाथांना एवढा पूजतो की... जणू त्यांच्या प्रतिमेत राम पाहतो, बघा काय केलंय याने...
Follow us on

नवी दिल्लीः धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत (Ayodhya) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांचा एक जबरदस्त राजकीय समर्थक आहे. त्याने आपल्या गावात योगी आदित्यनाथांचे एक मंदिरच ((Temple) बनवलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये त्याने धनुष्यबाण घेतलेली एक मूर्तीची स्थापनाही केली आहे. आपल्या देशात नेत्यांचे समर्थन करण्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले असतील, पण धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका वेगळ्याच समर्थकाचे प्रकरण आता सगळ्यांसमोर आले आहे. प्रभाकर मौर्य यांची ओळख योगी समर्थक म्हणूनच आहे. आणि याच प्रभाकर मौर्य यांनी अयोध्येत योगी आदित्यनाथ यांचे मंदिर उभारले आहे.

त्या मंदिरामध्ये प्रभाकर मौर्य हे सकाळ-संध्याकाळ आरतीही करत असतात. याबरोबरच मौर्य यांनी आता मुख्यमंत्री योगींच्या समर्थनार्थ अनेक गाणी गायिलीही आहेत.

ज्याप्रमाणे त्यांची ही मंदिरातील भक्ती सगळ्यांना माहिती आहे, त्याच प्रमाणे त्यांचे यूट्यूबरही लाखो फॉलोवर्अस आहेत. याबद्दत त्यांना विचारले असता प्रभाकर मौर्य सांगतात की, योगींच्या मंदिराच्या उभारणीच्या कामात जो काही खर्च आला आहे तो सगळा पैसा हा यूट्यूबच्या माध्यमातून उभा केला आहे.

अयोध्यनगरीत योगी आदित्यनाथ यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आला होता. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामललाच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचेही काम केले होते.

अयोध्या धामपासून सुमारे 20 ते 25 किमी अंतरावर पूर्वा गावात हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात प्रभाकर सकाळ संध्याकाळ आरतीही करतात. त्यामुळे या मंदिराची चर्चा या परिसरात होऊ लागली आहे.

प्रभाकर मौर्य यांनी या मंदिरात योगींची धनुर्धारी अशी मूर्ती स्थापित केली आहे. मंदिरातील त्यांची ही मूर्ती ही 5 फूट 4 इंच आहे. मंदिरातील मूर्ती ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उंचीइतकीच आहे. प्रभाकर मौर्य योगींचे कट्टर समर्थक असून आदित्यनाथ यांनी त्यांचा अनेकदा त्यांचा गौरव केला आहे.