AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीला मोठा झटका, मुख्य निवडणूक आयुक्तांच्याविरोधातील आंदोलनापूर्वीच बडा नेता..

निवडणुक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने पुकारले. 2 ऑक्टोबरपासून आंदोलनाला सुरूवात होईल. त्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कॉकरोच जनता पार्टीला मोठा दणका बसला.

कॉकरोच जनता पार्टीला मोठा झटका, मुख्य निवडणूक आयुक्तांच्याविरोधातील आंदोलनापूर्वीच बडा नेता..
Cockroach Janata Party
| Updated on: Sep 28, 2026 | 1:35 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. ज्याची सुरूवात 2 ऑक्टोबर मुंबईपासून होणार आहे. 10 महिन्यात तब्बल 14 वेळा निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाविरोधात एसआयआरशी संबंधित आक्षेप घेतला. त्यात निवडणुक आयोगाने काही निर्णयावर स्पष्टीकरण देत काही निर्णय सहमतीने घेतल्याचे म्हटले. सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अभिजीत दिपके, साैरभ दास आणि आशुतोष रांका यांनी स्पष्ट शब्दात पत्रकार परिषदेत म्हटले की, 48 तासात जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर देशभरात आंदोलन सुरू केले जाईल. दिल्लीतही आंदोलनावर त्यांनी भाष्य केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने 2 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची घोषणा केली. मात्र, त्यापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला.

सीजेपीचे मोठ्या तीन नेत्यांपैकी एक असलेला सौरभ दास आजारी पडला आहे. त्याला डेंगू झाल्याची माहिती आहे. डेंगूमुळे सौरभ दास हा आंदोलनात सहभागी होऊ शकणार नाहीये. आशुतोष रांकाला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी अभिजीत दिपके यांनी आपण तिथे जात असल्याचे म्हटले. मला एअरपोर्टवरूनच अटक करा, असे दिपकेने म्हटले.

अभिजीत दिपके यांनी सौरभ दास याच्याबद्दल बोलताना म्हटले की, तू लवकर बरा हो.. जर मला आणि आशुला आसामध्ये ठेवले तर तुला 2 ऑक्टोबरला मुंबईकडे रवाना व्हावे लागेल. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात जंतर मंतरवर जुलै महिन्यात ज्यावेळी आंदोलन सुरू झाले, त्यावेळी अभिजीत दिपके यांना डायफाईड झाला. आंदोलनाच्या शेवटच्या दिवसात जे आजार पडले. आंदोलन झाल्यानंतर काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यातच आता निवडणुक आयुक्तांविरोधातील लढाईत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सीजेपीला मोठा धक्का बसला. मोठा नेताच या आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे सीजेपीला आंदोलनापूर्वीच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. सीजेपीकडून मोठी घोषणा करण्यात आली. यापूर्वी असेच मोठे आंदोलन सीजेपीने पुकारले. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल