Rahul Gandhi: भारत आर्थिक त्सुनामीकडे… अमेरिकेत काय म्हणाले राहुल गांधी? बेरोजगारीवरून मोदी सरकावर मोठा निशाणा

Rahul Gandhi India Economic Crisis: भारत आर्थिक त्सुनामीकडे जात असल्याचे मोठे वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केले. कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी टीका केली.

Rahul Gandhi: भारत आर्थिक त्सुनामीकडे... अमेरिकेत काय म्हणाले राहुल गांधी? बेरोजगारीवरून मोदी सरकावर मोठा निशाणा
भारत आर्थिक त्सुनामीकडे... अमेरिकेत काय म्हणाले राहुल गांधी?
| Updated on: Nov 18, 2026 | 9:20 AM

Rahul Gandhi India Economic Crisis: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी मोठी चिंता व्यक्त केली. त्यांनी देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचे आणि शिक्षण व्यवस्थेतील सध्याच्या धोरणांवरून कडाडून टीका केली. भारतावर मोठे आर्थिक संकट येत आहे. बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे हे संकट घोंगावत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केला. त्यांच्या या दाव्यामुळे देशात नवीन वादाला तोंड फुटले आहे.

तरुणांचा एक वर्ग सध्याच्या परिस्थितीमुळे निराश

Loading...

भारताच्या तरुणाविषयी सूत्रसंचालक लिडिया पोलग्रीन यांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला होता. त्याला त्यांनी उत्तर दिले. देशातील तरुणांचा एक गट, जो सध्याच्या परिस्थितीबाबत निराशा व्यक्त करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांचा एक वर्ग नाराज असल्याचे ते म्हणाले. या तरुणाने औपचारिक शिक्षणही घेतले आहे. या तरुणांना देशात त्यांचे पुढील भविष्य दिसत नसल्याने ते निराश झाल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला.

नवीन पिढीचे जुन्या पिढीच्या सल्ल्यावरच प्रश्नचिन्ह

करिअरविषयी संधी नसल्याने तरुण आणि आई-वडिलांमध्ये दुरावा वाढत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. नवीन पिढी, जुन्या पिढीच्या सल्ल्यावरच आणि अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तरुण आणि आई-वडीलांमध्ये करिअर आणि रोजगाराविषयी मतमतांतरं आहेत. यामुळे दरी रूंदावत आहे, असे ते म्हणाले. तरुण पिढी आपल्या पालकांना आणि आम्हाला हे थेट पालकांकडून ऐकायला मिळत आहे. तुम्ही स्वत:च यशस्वी नाही आहात, तुमच्याकडे नोकऱ्या नाहीत. तुम्ही आम्हालाही त्याच मार्गावर चालण्यास सांगू शकत नाही. ज्या मार्गावरून तुम्ही गेलात, तो आता कालबाह्य झाल्याचे तरुणाई त्यांच्या जुन्या पिढीला सांगत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

आज शिकागो विद्यापीठात

राहुल गांधी अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात विविध विषयांवर मत मांडले. तर आज शिकागो येथील विद्यापीठात ते संवाद साधणार आहेत.

भाजपचा राहुल गांधी यांच्यावर पलटवार

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते भारताविरोधात दुष्प्रचार आणि बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी हे भारतावर आर्थिक संकट येत असल्याचा आरोप करतात आणि लोकशाहीविरोधात बोलतात असे भंडारी म्हणाले. तर दुसरीकडे संपूर्ण जग भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे म्हणत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us