इंडिया आघाडीच्या मोर्चाआधी राहुल गांधींचा मोठा दावा, म्हणाले, मोदी सरकारमधील 200 अधिकारी…; विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

इंडिया आघाडीच्या मोर्चाआधी राहुल गांधींनी मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इंडिया आघाडीच्या मोर्चाआधी राहुल गांधींचा मोठा दावा, म्हणाले, मोदी सरकारमधील 200 अधिकारी...; विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
Rahul gandhi news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 1:21 PM

इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चासाठी देशभरातील इंडिया आघाडीचे आमदार आणि खासदार दिल्लीत येणार आहेत. परंतु त्यांना दिल्ली येण्यापासून पोलिसांकडून रोखलं जात आहे. दिल्लीत प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, असा आरोप गांधींनी केला. त्यानंतर मोदी सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या दाव्याने राजकीय वातारण ढवळून निघालं आहे.

लोकसभेचे  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं की, पोलीस आणि प्रशासनातील लोक सरकारवर नाराज आहेत. पोलिसांना विद्यार्थ्यांना माराहण करण्यास भाग पाडलं जात आहे. पोलीस वर्ग विद्यार्थ्यांना मारू इच्छित नाही. भाजप आणि आरएसएसचे लोक विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहेत. मतचोरीच्या विरोधातील आंदोलन दडपण्याचं काम सुरू आहे. परंतु मी प्रश्न विचारू इच्छित आहे की, ज्ञानेश कुमार राजीनामा न देण्याचं कारण काय? सरकार ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी कोणतीही जागा देऊ इच्छित नाही. जंतर मंतरवरही जाऊ देत नाही’.

Loading...

राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘रस्त्यावर 20000 ते 30000 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले जात आहे. सरकार मोठी चूक करत आहे. सरकार ज्ञानेश कुमार यांचा बचाव करत आहे, हे आम्हाला दाखवायचं आहे. त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परंतु आम्ही शेवटी त्यांच्यापर्यंत पोहोचू. पोलीस कर्मचारी त्रस्त असल्याची माहिती आहे. त्यांना तरुणांना माराहण करण्याचे आदेश दिले जात आहेत. आरएसएसच्या सदस्यांना देखील मोकळीक देण्यात आली आहे’.

ते पुढे म्हणाले, मी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहिलं, त्यात आम्ही लोकशाही आणि पारदर्शक निवडणुकांचा अंत झाल्याचे म्हटलं आहे. या पत्रानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी आणि इंडिया आघाडीचे नेते मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत’, असे राहुल गांधी यांनी सांगितले. इंडिया आघाडीचे नेते सुप्रीम कोर्टात दुपारी तीन वाजता याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी दावा केला की, सराकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत. हे अधिकारी आम्हाला माहिती देत आहेत. ईडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी हे आम्हाला माहिती देत आहेत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us