AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांच्या सरन्यायाधीशांच्या भेटीच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले, संविधानात…’

विरोधकांच्या सरन्यायाधीशांच्या भेटीच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

विरोधकांच्या सरन्यायाधीशांच्या भेटीच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले, संविधानात...'
devendra fadnavisImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 12:32 PM
Share

इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टानचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या भेटीची मागणी केली होती. इंडिया आघाडी थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे भेटीची मागणी केली होती. परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेटीची मागणी फेटाळून लावली. त्याऐवजी कोर्टात याचिका दाखल करा, मी सुनावणी घ्यायला तयार असल्याचे म्हटलं. सरन्यायाधीशांनी भेटीस नकार दिल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सरन्यायाधीशांच्या भेटीची मागणी करत आहात. तुम्ही संविधानाच्या बाता करता. कोणत्या संविधानात लिहिलं आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोणत्या मोर्चाला सामोरे जातात का, मी मानतो की, जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, ते योग्य आहे. तुम्ही कोर्टात जावा. कोर्टात जाऊन लढा. खरंतर त्यांचा संविधानावर विश्वास नाही. हे संविधानविरोधी आहे. सरन्यायाधीशांनी कायदेशीरित्या संविधानिक अधिकाराचा वापर करून भेटीस नकार दिला. मी कोणत्या मोर्चाला भेटू शकत नाही. हे लोक सरन्यायाधीशांना शिवागीळ करत आहेत. संविधानिक संस्थावरून लोकांचा विश्वास उडला पाहिजे, याचं षडयंत्र आखत आहेत.

इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टाच्या मोर्चावरील सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

सुधीर मुनगंटीवर म्हणाले, ‘काँग्रेस आणि विरोधी पक्ष देशापुढच्या प्रश्नांवर आंदोलन करणार असेल. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणार असेल. देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आंदोलन करणार असेल तर समजू शकतो. मात्र निवडणुकीत पराभव होतो म्हणून कारण शोधण्यासाठीचा मोर्च योग्य नव्हे. काँग्रेसने सर्वच घटनात्मक संस्था शंकास्पद करून टाकल्या आहेत. ज्ञानेश कुमार एकटेच काम करत नसून देशभरातील लाखो कर्मचारी काम करतात. त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचाही समावेश आहे. हे कर्मचारी निष्पक्ष नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे’.

Follow Us
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...