काँग्रेसच्या या बड्या नेत्याचे लग्न जुळेना, फेसबुकवर मांडल्या भावना, कशी हवी वधू?

Congress Leader Marriage : देशातील अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना लग्न करायचे आहे. पण नोकरी आणि इतर कारणांमुळे त्यांचं लग्न काही जुळेना. पण ही परिस्थिती बेरोजगार तरुणांचीच आहे अशी नाही. काँग्रेसच्या या नेत्याचे लग्नाचे वय उलटत आले तरी त्याला साजेशी नवरी मिळत नसल्याने तो चिंतेत सापडला आहे.

काँग्रेसच्या या बड्या नेत्याचे लग्न जुळेना, फेसबुकवर मांडल्या भावना, कशी हवी वधू?
बिहार काँग्रेस नेता
| Updated on: Sep 25, 2026 | 12:20 PM

देशातील अनेक तरुणांची लग्न जुळत नाहीये. बेरोजगारी आणि इतर अनेक कारणं आहेत. महाराष्ट्रात तर लग्नासाठी तरुणांचे मोर्चेही निघाले आहेत. तर काही जणांना लग्नाच्या आमिषाने गंडवण्यात आले आहे. तरुणाईच्या या व्यथेने एका नवीन सामाजिक प्रश्नाला जन्म घातला आहे. पण बेरोजगारच नाही तर काँग्रेसचा हा मोठा नेताही लग्न जुळत नसल्याने त्रासून गेला आहे. बिहारमधील काँग्रेस नेत्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट लिहित लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनातील भावना आणि भावी वधू विषयी त्याने फेसबुकवर भावना व्यक्त केल्या आहेत. मुझफ्फरपूर येथील काँग्रेस नेता मयंत कुमार मुन्ना यांनी फेसबुकवर त्यांची लग्नाची इच्छा जाहीर केली आहे.

अहो, मी तर लग्नाला तयार!

मयंक मुन्ना यांनी फेसबुकवर लग्न करण्याची इच्छा जाहीर केली. मी लग्न करू इच्छित नाही अशा उगाच वावड्या माझे कुटुंबिय आणि जवळच्या नातेवाईकांनी उठवल्याचा चिमटा त्यांनी काढला. मी तर लग्नाला एका पायावर तयार आहे. मला एक चांगला आणि समजदार जोडीदार हवा आहे, असे त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यंदा कर्तव्य आहे, असा हवा भावी जोडीदार

त्यांनी लग्नाविषयी सार्वजनिकरित्या मत, भावना आणि इच्छा जाहीर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबकबिला वाढवण्याची इच्छा व्यक्त केली. माझे मित्र आणि शुभचिंतकांनी आता माझ्यासाठी योग्य जोडीदार शोधावा. मुलगी सुसंस्कृत, शालीन, सुशील हवी. भलेही ती गरीब कुटुंबातील असेल. पण ती संस्कारी, सुंदर, समजूतदार आणि एकत्र कुटुंबासोबत राहणारी हवी, असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी वधू कशी हवी हे सांगितले.

व्यक्त केली ती खंत

काँग्रेस नेते मुन्ना यांनी सांगितले की, राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना कधी वेळ निघून गेला ते कळलेच नाही. लग्नाची तारीख पे तारीख मी देत गेलो आणि आता इतक्या वर्षानंतर ती चूक उमगली. आता मी भविष्याविषयी अधिक गंभीर झालो आहे. मला भविष्याची चिंता वाटत आहे. जे पण मित्र, सहकारी, नातेवाईक माझी प्रामाणिकपणे मदत करू इच्छितात, त्यांनी माझ्या लग्नासाठी बोलणी करण्यास हरकत नसल्याच्या भावना या बिहारी बाबूने व्यक्त केल्या.

समाजात, नातेवाईकांऐवजी फेसबुकवरून आवाहन का?

मयंक कुमार मुन्ना यांना अनेकांनी हा प्रश्न विचारला. इतका मोठा जनसंपर्क आहे. नातेवाईक राजकारणात, मित्र परिवार मोठा आहे. अनेकांसाठी ते धावून गेले आहेत. असे असतानाही लग्नासारखा एक महत्त्वाचा विषय त्यांनी फेसबुकवर का मांडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

असे विषय समाज माध्यमांवर मांडयाचे नाहीत, हे मलाही कळते, पण काही परिस्थितींमुळे मला सोशल मीडियावरून लग्नाचा प्रस्ताव मांडावा लागल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. मयंक कुमार मु्न्ना हे बिहार काँग्रेसचे सचिव राहिलेले आहेत. युथ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. 2010 मध्ये त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत मुझफ्फरपूर येथून निवडणूकही लढवली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us