AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress MP : काँग्रेसला सर्वात मोठा झटका, या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Loksabha election : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये पुन्हा एकदा इनकमिंग सुरु झाले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे अनेक जणांना भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला जात आहे, आगामी निवडणुका लक्षात घेऊन मोठ्या चेहऱ्यांना पक्षात येण्याची संधी दिली जात आहे.

Congress MP : काँग्रेसला सर्वात मोठा झटका, या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 27, 2024 | 5:27 PM
Share

election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. कारण पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राठवा यांनी काँग्रेसला रामराम करत कमळ हाती घेतला आहे. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अनेक समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते पहिल्यांदा 1989 मध्ये निवडून आले होते. त्यानंतर 1991, 1996, 1998 आणि 2004 मध्ये लोकसभेचे सदस्य झाले.

राज्यसभेचे खासदार

गुजरातमधील छोटा उदयपूर येथील आदिवासी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राठवा हे काँग्रेसमधून राज्यसभा सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे. ते पाच वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. पण त्यानंतर ते राज्यसभेवर निवडून गेले होते.

नारायण राठवा यांचा मुलगा संग्राम सिंह यांनी देखील 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. आज त्यांनी वडील आणि आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नारायण राठवा 2004 मध्ये यूपीए सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राम सिंह राठवा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी राठवा यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

काँग्रेससाठी मोठा झटका

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा झटका आहे. सध्या भाजपकडून देशभरातील मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मोठे नेते आता भाजपमध्ये येत आहेत. नारायण राठवा हे त्यांच्या भागात काँग्रेसचा मोठा चेहरा होते. पण आता भाजपमध्ये आल्याने भाजपला देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे.

भाजपकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने जुन्या सहकारी मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी एक कमिटी बनवली आहे. ती कमिटी जुन्या सहकारी नेत्यांना भाजपसोबत आणण्याचं काम करत आहे.

भाजपचा ४०० पारचा नारा

भाजपने लोकसभा निवडणुकीत ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. तर एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. त्यामुळे ४०० चा आकडा गाठण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं