
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर (Congress President Election) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शशी थरुरांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्रमुख मधुसूधन मिस्त्रींनी (Madhusudan Mistri) शशी थरूर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांना काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी बोलताना सांगितले की, शशी थरूर यांनी केलेल्या मागण्या आम्ही मान्य केल्या होत्या. तरीही ते माध्यमांमध्ये जाऊन वेगळी वक्तव्य करत असल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे थरुर यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्ही दोन्ही बाजूनी बोलत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
त्यांच्या आरोपांना उत्तर देताना ते मिस्त्री म्हणाले की, आम्ही तुमच्या विनंत्या मान्य केल्या होत्या तरीही तुम्ही माध्यमांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनीच तुमच्याविरुद्ध कट रचत असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर शशी थरूर यांनी निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप केला होता.
विशेषत: उत्तर प्रदेशात मतदानात गोंधळ झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे मधुसूदन मिस्त्री यांनी त्यांच्यावर दुतोंडी बोलत असल्याची टीका केली आहे.
ते म्हणाले की तुम्ही माझ्यासमोर बोलताना समाधानी असल्याचे म्हटले होते, आणि आता माध्यमांमधून प्रतिक्रिया देताना खोटे आरोप करत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर शशी थरूर यांनी मतदानात अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केला होता.
त्याबाबतचे पत्रही त्यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तर अध्यक्षपदाच्या निकालानंतर थरूर यांनीही मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन करत हा काँग्रेसचा विजय असल्याचे म्हटले होते.
ही निवडणूक वैयक्तिक नसून ती पक्षाची निवडणूक आहे आणि हा विजय पक्षाचा विजय असल्याचेही त्यांनी सांगितले होते. थरूर यांनी लिहिलेल्या पत्रात प्रामुख्याने चार तक्रारी करण्यात आल्या होत्या.
मतपेट्यांसाठी अनौपचारिक सील, मतदान केंद्रांवर अनौपचारिक लोकांची उपस्थिती, मतदानादरम्यान गैरप्रकार आणि मतदान पत्रकांची कमतरता असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.