अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, काँग्रेस अजून चर्चेच्याच पवित्र्यात…

| Updated on: Sep 30, 2022 | 2:54 PM

अशोक गेहलोत, सचिन पायलट, दिग्विजय सिंह यांची नावं अध्यक्षपदासाठी नेहमीच चर्चेत राहिली होती, मात्र ऐनवेळी बाजी मारली ती मल्लिकार्जून खर्गे यांनीच...

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, काँग्रेस अजून चर्चेच्याच पवित्र्यात...
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे (Congress President Election 2022) सगळ्यात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचे वातावरण ढवळून निघाले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचा नवा चेहरा कोण असणार हे सायंकाळ पर्यंत स्पष्ट होईल असंही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे पक्षाध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार समजले गेलेले माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस दिग्जविजय सिंह (Dighvijay Singh) यांनी या निवडणुकीतून अखेर माघार घेतल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी समोर आले असतानाच दिग्विजय यांनी माघारीची घोषणा केल्याने त्यामुळे जोरदार गदारोळ माजला आहे.

काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी कालपर्यंत निवडणूक लढवण्यास नकारच दिला होता. मात्र रात्री उशिरा गांधी कुटुंबीयांनी त्यांच्या नावासाठी सहमती दर्शवल्याने ते निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिग्विजय सिंह गटाला मल्लिकार्जून खर्गे यांची ही बातमी रात्री उशिरा समजली. त्यामुळे गेहलोतांना जो नियम लावण्यात आला होता तोच नियम म्हणजे एक व्यक्ती, एक पद हे तत्व लागू करण्याची मागणी हायकमांडकडे करण्यात आली आहे.

त्यामुळे मल्लिकार्जून खर्गे यांना अध्यक्षपदासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

त्यानंतर वेणुगोपाल यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाचे चित्र तासाभरातच स्पष्ट होईल असंही त्यांनी दिग्विजय सिंह यांना सांगितले.

वेणुगोपाल यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नसल्याचेच जाहीर केले.

देशातील दलितांसाठीचा लढा खर्गे लढत राहणार असल्याचे त्यांनी काल म्हटले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दलितांसाठी झटणारे नेतृत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

सतत कोणत्या ना कोणत्या कामात गढून गेलेले खर्गे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाहीत असंही दिग्विजय सिंह यांनी आधी एक दिवस स्पष्ट केले होते. कारण खर्गे यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकारच दिला होता.

अशोक गेहलोत आणि राजस्थानातील काँग्रेसचा वाद टोकाला गेल्या नंतर दिग्विजय सिंह यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असं चित्र निर्माण झाले होते.

तर दुसरीकडे मुकुल वासनिक, अंबिका सोनी, पवन बन्सल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोणीही होऊ शकेल मात्र त्यामध्ये एकमत दिसले पाहिजे असं मत हायकमांडकडे व्यक्त करण्यात आले होते.

त्यातच शशी थरूर यांचेही नाव चर्चेत आले, मात्र नेत्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. त्याचवेळी भूपिंदर सिंग हुड्डा यांना निवडणूक लढवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी त्याला स्पष्ट नकाल दिला होता.

पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अध्यक्ष पदाच्या चर्चेसाठी प्रियंका गांधी यांच्या घरी गेल्यावर जेवतानाच चर्चा करण्यात आली.

यावेली ऑनलाईनवरुन राहुल गांधीही त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि त्याचवेळी मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव अंतिम झाले.

मात्र त्याचवेळी दिग्विजय सिंह यांची मनधरणी कशी करणे गरजेचे होते. त्याचवेळी एक व्यक्ती, एक पद या तत्वानुसार खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्यासही राजी करण्यात आले.