मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे भीष्म पितामह; पण…

| Updated on: Sep 30, 2022 | 5:47 PM

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर शशी थरूर म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी निश्चितच स्वागतार्ह आहे.

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे भीष्म पितामह; पण...
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदावरुन राजस्थानातील काँग्रेसची (Congress President) गटबाजी समोर आली, आणि त्यामध्ये अशोक गेहलोतांचा (Ashok Gehlot) राजकीय बळी गेला. अध्यक्ष पदाच्या निवडणुका जाहीर होताच अशोक गेहलोतांनी सचिन पायलट यांच्यावर राजकारण खेळण्यास चालू केलं. मात्र या युद्धात सचिन पायलटांचा बळी न जाता गेहलोतांनाच सपशेल माघार घ्यावी लागली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावाला गांधी कुटुंबीयांनी पसंदी दिल्यानंतर आता शशी थरुरांची मनधरणी करावी लागतन नाही. त्यामुळे शशी थरुरांनी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतरही शशी थरूर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आहे.

तर खर्गे यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून का प्रोजेक्ट केले जात आहे, असा सवालही त्यांनी हायकमांडला विचारला आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर शशी थरूर म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी निश्चितच स्वागतार्ह आहे.

खरं तर पक्षहिताच्या दृष्टीने अनेक उमेदवारांची तशी गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. खर्गेंनी उमेदवारी जाहीर केली असली तरी मीही काही निवडणूक लढण्यापासून मागे हटणार नाही, असं सांगत ज्यांनी माझ्याकडून आशा ठेवल्या आहेत, त्यांना मी निराश करु शकत नाही असंही त्यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी बोलताना ते त्यांना म्हणाले की, ते नक्कीच पक्षाचे भीष्म पितामह आहेत. त्यामुळे माझी उमेदवारी ही त्यांचा अनादर करण्यासाठी नाही तर पक्षाच्या विचाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत शशी थरुन यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे या निवडणुकीत गांधी परिवार तटस्थ राहणार आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीमुळे कोणाचाही अपमान होऊ नये, हीच भावना माझ्या मनात ठेवून मी उमेदवारी जाहीर केल्याचे थरुर यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे आणि आपल्या उमेदवारीविषयी बोलताना ते म्हणाले की, आम्ही काही शत्रू नाही, किंवा प्रतिस्पर्धीही नाही.

आम्ही चांगले मित्र आहोत आणि पक्षाची प्रगती करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आता पक्षाला कोणत्या दिशेने पुढे घेऊन जायचे हे काँग्रेसचे कार्यकर्तेच ठरवतील असंही त्यांनी सांगितले.

खर्गे, दिग्विजय सिंह, के. एन. त्रिपाठी यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही नकारात्मक भावाना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मी ही निवडणूक लढवण्याचा यासाठीच निर्णय घेतला आहे की, काँग्रेसला मला बळकट करायचे आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी माझ्याकडे व्हिजन तयार आहे.

त्यासाठी कल्पना आणि संकल्पना तयार आहेत. त्यामुळे परिवर्तनाचा मला एक प्रतिनिधी व्हायचे आहे. त्यासाठी मी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, शुक्रवारी शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे आणि के.एन. त्रिपाठी यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.