Shalimar Coromandel Express Derails : कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर्स, तुमच्या लोकांची घ्या माहिती!

| Updated on: Jun 02, 2023 | 11:25 PM

ओडिशामध्ये कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे विभागाकडून हेल्पलाईन नंबर्स देण्यात आले आहेत.

Shalimar Coromandel Express Derails : कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर्स, तुमच्या लोकांची घ्या माहिती!
Follow us on

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या  कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. (Coromandel Express Train Accident)  कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये 30 जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. तर 180 पेक्षा अधिक लोकं ही जखमी झाली आहेत. धडक झाल्यावर ट्रेनची अवस्था पाहता हे आकडे आणखी वाढले जाण्याची भाती आहे. यादरम्यान स्थानिक प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

अपघात झालेल्या ठिकाणी बचावकार्य सुरूअसून स्थानिक लोकांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वेच्या डब्यामध्ये अडकलेल्या जखमींना वाचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. ओडिशातील बालासोरपासून 40 किमी अंतरावर हा अपघात झाला.  बहुतांश लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.  ट्रेनमधील एकूण 18 डब्यांपैकी 15 डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या रेल्वे अपघातामुळे या मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही बाजूंच्या गाड्या सध्या बंद करण्यात आल्या असून, त्यामुळे या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात संध्याकाळी 6.51 वाजता घडला.  लोकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

रेल्वेने वेगवेगळ्या स्थानकांवरून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांमध्ये, 033 26382217, खरगपूर हेल्पलाइन क्रमांक 8972073925/9332392339, बालासोर हेल्पलाइन क्रमांक – 8249591559/7978418322 आणि शालीमार हेल्पलाइन क्रमांक 9903370746 हावरा स्टेशनवरून जारी करण्यात आला आहे.

चेन्नई सेंट्रलने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत, प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बूथही उघडले जात आहेत. या क्रमांकांवर संपर्क साधला जाऊ शकतो – 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771.

या अपघातावर शोक व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.