कोरोनाची तिसरी लाट रोखली जाऊ शकते? केंद्राच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सांगितला उपाय

| Updated on: May 07, 2021 | 6:30 PM

के. विजय राघवन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं विधान बुधवारी केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखली जाऊ शकते? केंद्राच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सांगितला उपाय
Corona Virus
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं विधान बुधवारी केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. राघवन यांचं हे मार्गदर्शन केंद्र आणि राज्य सरकारांना उपयुक्त ठरणारं आहे. (Important advice Regarding the third wave of corona, From K. Vijay Raghavan)

आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट येऊ शकणार नाही. स्थानिक, राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोना संदर्भातील सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी करतो, यावर ते अवलंबून असेल, असं राघवन यांनी म्हटलंय. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर कठोर पावलं उचलण्याबरोबरच कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचंही राघवन म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ बंगळुरूचे एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. गिरीधर बाबू यांच्यामते, थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

कोरोनाची तिसरी लाट ही तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. यातील पहिला घटक म्हणजे लसीकरण, दुसऱ्या सुपर स्प्रेडर, तिसरा नवी व्हेरिंटचा शोध घेणे. म्हणजे सर्वात आधी येत्या डिसेंबरपर्यंत आपल्याला कोरोना लसीकरण करावे लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे आपण सुपर स्प्रेडर इव्हेंटला किती रोखू शकतो. तिसरे म्हणजे आपण नवीन व्हेरिंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

तिसरी लाट आल्यानंतर काय होणार?

गणिताचे मॉडेल तज्ज्ञ प्राध्यापक एम. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ” कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यातील काहींना कोरोना सदृश लक्षणही जाणवत नाहीत. पण तरीही त्यांना लागण झाल्याचे उघड होत आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना सर्वप्रथम लस देणे गरजेचे आहे. पुढील सहा महिन्यात लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होईल.

संबंधित बातम्या :

कोरोनाची लाट किती दिवस राहणार?, काय केले पाहिजे?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात

“शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत घसरणे चिंताजनक नाही, पण….”, एम्स रुग्णालयाची नवी माहिती

Important advice Regarding the third wave of corona, From K. Vijay Raghavan