“शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत घसरणे चिंताजनक नाही, पण….”, एम्स रुग्णालयाची नवी माहिती

शरीरातील ऑक्सिजनची पतळी ही 92 ते 93 पर्यंत जाणे म्हणजे चिंताजनक नही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत घसरणे चिंताजनक नाही, पण...., एम्स रुग्णालयाची नवी माहिती
oxygen
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 4:24 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या हाहा:कार उडाला आहे. रोज लाखोंनी रुग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती जास्तच गंभीर होत चालली आहे. रेमडेसिव्हीर, इतर औषधी तसेच ऑक्सिजनचा गंभीर तुटवडा भासतो आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांनी तडफडून प्राण सोडल्याच्या घटनासुद्धा अनेक ठिकाणाहून समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयाने मोठी माहिती दिली आहे. शरीरातील ऑक्सिजनची पतळी (oxygen level) ही 92 ते 93 टक्क्यांपर्यंत जाणे हे चिंताजनक नही, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (AIIMS) डॉक्टर रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी म्हटलं आहे. (oxygen level of 92 or 93 in COVID-19 patients should not be considered critical said AIIMS Randeep Guleria)

ऑक्सिजन 93 पर्यंत पोहोचणे चिंताजनक नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात रणदीप गुलेरीया यांनी शरीरातील ऑक्सिजन पातळीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळई ही 92 किंवा 93 पर्यंत गेल्यानंतर काळजी करण्याचे कारण नाही. उलट घाबरुन न जाता शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत खाली आली म्हणजे रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर दाखल करण्याचे हे निदर्शक समजावे, असे त्यांनी म्हटलंय.

ऑक्सिजन 94 असेल तर चिंता करु नये

यावेळी रणदीप गुलेरीया यांनी देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असून त्याचा जपून वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात आपल्याला गरज पडेल म्हणून काही व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडर आपल्या घरात लपवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात ऑक्सिजन अशा प्रकारे लपवून ठेवणे चुकीचे असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे. तसेच शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी 94 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चिंता करु नये. तुमच्या शरीरात 94 टक्के ऑक्सिजन असेल तर तो पुरेसा आहे. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन नॉर्मल असूनसुद्धा तो वापरला तर ज्या रुग्णांच्या शरिरात 90 ते 80 टक्क्यांपर्यत ऑक्सिजन आहे;  त्यांना वेळेवर ऑक्सिजन भेटण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ?

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. तसेच जर रुग्णाचा ऑक्सिजन 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला आरोग्यविषयक आणीबाणीची पस्थिती समजून रुग्णालयात तत्काळ दाखल करावे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

इतर बातम्या :

ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करते पिंपळाचे पान, जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.