AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित

देशभरातील 2546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Corona Update India). मात्र, गेल्या 24 तासात देशात 1553 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 20, 2020 | 7:42 PM
Share

नवी दिल्ली : “देशभरातील 2546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Corona Update India). देशात गेल्या 24 तासात नवे 1553 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 17,265 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे गेल्या 24 तासात 36 जणांचा मृत्यू झाला आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अग्रवाल बोलत होते (Corona Update India).

“देशात साडेसात दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. याअगोदर साडेतीन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट व्हायचा. देशभरातील 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. गोवा राज्य कोरोनामुक्त झाला आहे. याशिवाय पुदुचेरी, कर्नाटकचे कोडागू आणि उत्तराखंडच्या पौडी गढवाल या भागांमध्ये गेल्या 28 दिवसांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही”, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, “लॉकडाऊनवर कडक नजर ठेवली जात आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ज्या राज्यांमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन होत आहे त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत”, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केरळ सरकारला अशा प्रकारच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती दिली.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!