Coronavirus Updates: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ; 24 तासांत 2219 जण दगावले

| Updated on: Jun 09, 2021 | 9:54 AM

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 92,596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. | Coronavirus updates

Coronavirus Updates: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ; 24 तासांत 2219 जण दगावले
कोरोना व्हायरस
Follow us on

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा किंचितशी वाढली आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार देशभरात आदल्या दिवशी 86,498 नव्या कोरोना (Coroanvirus) रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आज ही संख्या तब्बल सहा हजारांनी वाढली आहे. (New Coronavirus cases in India)

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 92,596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) शिगेला असताना देशात प्रत्येकदिवशी चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी झाल्याने ही भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 92,596

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,62,664

देशात 24 तासात मृत्यू – 2219

एकूण रूग्ण – 2,90,89,069

एकूण डिस्चार्ज – 2,75,04,126

एकूण मृत्यू – 3,53,528

एकूण सक्रिय रुग्ण – 12,31,415


आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 23,90,58,360

मुंबईत करोनाचे 673 नवे रुग्ण, 7 मृत्यू

मुंबईतील रुग्णसंख्या बुधवारी आणखी कमी झाली असून 673 नव्या रुग्णांची नोंद झाली. दैनंदिन मृतांची संख्याही कमी झाली असून 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी 26 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण अडीच टक्के आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या 7 लाख 13 हजारांपुढे गेली आहे. करोना मृतांची एकू ण संख्या 15073 झाली आहे.

(New Coronavirus cases in India)