खासगी रुग्णालयासाठी लसींच्या किमती ठरल्या, कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लस किती रुपयांना मिळणार ? नवे दर काय ?

केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसेच लसीवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयही केंद्राने घेतला घेतला आहे.

खासगी रुग्णालयासाठी लसींच्या किमती ठरल्या, कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लस किती रुपयांना मिळणार ? नवे दर काय ?
VACCINATION
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 11:01 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर केंद्र सरकारने लसपुरवठा तसेच इतर बाबींशी निगडित धोरणात्मक निर्णय घेणे सुरु केले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसेच लसीवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयही केंद्राने घेतला घेतला आहे. (central government announced new rate for Covishield Sputnik V Covaxin Corona vaccine)

खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयानुसार कोव्हिशिल्ड या लसीची किंमत प्रतिडोस 780 रुपये एवढी असेल. तर कोव्हॅक्सिन या लसीचा दर हा प्रतिडोस 1410 एवढा असेल. स्पुतनिक-V या लसीचा दर प्रतिडोस 1145 रुपये एवढा असेल. हे सर्व दर हे खासगी रुग्णालयांसाठी असतील.

लसीवर 5 टक्के जीएसटी आकारणार

केंद्र सरकारने कोरोना प्रधिबंधक लसीवर 5 टक्के GST आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व लसींवर 150 रुपये प्रतिडोस सर्व्हिस चार्ज आकारण्याचेसुद्धा केंद्राने ठरवले आहे. येत्या 21 जूनपासून केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचे मोफत वाटप केले जाणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

लस निर्मिती कंपन्यांना 30 टक्के रक्कम दिली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसपुरवठा आणि लसीकरण पद्धतीविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने सध्या एकूण 74 कोटी डोसेसाठी ऑर्डर दिलेली आहे. त्यामध्ये 25 कोटी कोव्हिशिल्ड, तर 19 कोटी कोव्हॅक्सिन लसीच्या डोसेसचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त सरकारने ई-बायोलॉजिकल लिमिटेडला 30 कोटी डोसेसची ऑर्डर दिल्याचेही केंद्राने सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने लसीच्या या सर्व कंपन्यांना लसखरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 30 टक्के रक्कम आधीच देऊ केली आहे.

दरम्यान, सध्याच्या नव्या गाईडलाईन्सनुसार एकूण लसींपैकी 75 टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करणार आहे. तसेच या सर्व लसी राज्यांना मोफत दिल्या जातील. नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी तशी माहिती दिली. तसेच ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण जास्त असेल तिथे लसी जास्त प्रमाणात पोहचवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना केंद्राकडून जाहीर, 21 जूनपासून अंमलबजावणी

‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

मोठी बातमी: भारताला मोठा दिलासा; नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

(central government announced new rate for Covishield Sputnik V Covaxin Corona vaccine)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.