‘कोविशिल्ड’पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ही झाली स्वस्त; भारत बायोटेकची लस आता 400 रुपयांत मिळणार

| Updated on: Apr 29, 2021 | 8:54 PM

याआधी सिरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला यांनी कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. म्हणजेच कोविशिल्ड लस सुधारीत दरानुसार राज्यांना 400 रुपयांऐवजी 300 रुपयांना मिळणार आहे. (Covaccine also became cheaper; Bharat Biotech vaccine will be now available for Rs 400)

‘कोविशिल्ड’पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ही झाली स्वस्त; भारत बायोटेकची लस आता 400 रुपयांत मिळणार
‘कोविशिल्ड’पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ही झाली स्वस्त
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण खुले केले जाणार आहे. मात्र लस उत्पादक कंपन्यांनी केलेल्या दरवाढीची नागरिकांना चिंता होती. ही चिंता आता दूर झाली आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीपाठोपाठ आता भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही स्वदेशी लसही स्वस्त झाली आहे. ही लस राज्यांना 600 रुपयांऐवजी सुधारीत दरानुसार 400 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. याआधी सिरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला यांनी कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. म्हणजेच कोविशिल्ड लस सुधारीत दरानुसार राज्यांना 400 रुपयांऐवजी 300 रुपयांना मिळणार आहे. (Covaccine also became cheaper; Bharat Biotech vaccine will be now available for Rs 400)

किंमत कमी करण्याबाबत केंद्र सरकारने दिले होते निर्देश

कोरोना महामारीत लसीसाठी ज्यादा पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तसेच चौफेर टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांना दर कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्याला अनुसरून दोन्ही कंपन्यांनी लसीच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पडवडणार्या आणि स्वस्त दराने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचवण्याचे उद्दीष्ट

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. गेल्या काही दिवसांपासून 3 लाखांच्या वर कोरोना रुग्ण वाढताहेत. ही चिंताजनक रुग्णवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाला अधिकाधिक गती देण्याचा निर्धार केला आहे. ही मोहिम देशाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे उद्दीष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. याचवेळी अधिकाधिक नागरिकांनी लसीचा लाभ घ्यावा या हेतूने सरकारने लस उत्पादक कंपन्यांना लसीसाठी जास्त किंमत न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

जगभरात कोरोना प्रतिबंधक लसींचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनने नुकत्याच जारी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातही दिलासादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. लस घेतलेली व्यक्ती स्वत: कोरोना संसर्गापासून सुरक्षित बनतेच, त्याचबरोबर इतरांनाही संसर्गाचा धोका कमी होतो, असे अमेरिका आणि ब्रिटनच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकार संपूर्ण भारतभर लसीकरण मोहिम वेळीच पूर्णत्वाला नेण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

खुल्या बाजारात लसविक्रीला मुभा

केंद्र सरकारने लसीकरणाला गती देण्यासाठीच सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला 50 टक्के लस राज्यांना आणि खुल्या बाजारात विकण्यास मुभा दिली. सरकारकडून ही परवानगी मिळताच दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे नवे दर जाहीर केले होते. (Covaccine also became cheaper; Bharat Biotech vaccine will be now available for Rs 400)

इतर बातम्या

महाराष्ट्रात गेल्या वर्षीसारखा कडक लॉकडाऊन लागू होणार? मुंबई उच्च न्यायालयाने दिले हे निर्देश

रेमडेसिव्हीर आणलेल्या ‘त्या’ खासगी विमानाची माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार ?