पुण्यातील लॉकडाऊन वाढवला; 15 मेपर्यंत निर्बंध कायम

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. (pune lockdown extended till may 15)

पुण्यातील लॉकडाऊन वाढवला; 15 मेपर्यंत निर्बंध कायम
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 7:10 PM

पुणे: पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. येत्या 15 मे पर्यंत पुण्यात लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना 15 मेपर्यंत सक्तीने कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. (pune lockdown extended till may 15)

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पुण्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास काढावा लागणार आहे. आतापर्यंत 9 हजार ई-पास देण्यात आल्या आहेत. नितांत गरज असेल तरच प्रवास करा. अथवा घरातच राहा, असं ट्विट गुप्ता यांनी केलं आहे.

दिवसभरात 2538 पॉझिटिव्ह रुग्ण

पुण्यात काल दिवसभरात 2538 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 4351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात करोनाबाधीत 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 16 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर 1371 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 402655 इतकी आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 47420 असून आतापर्यंत एकूण 6554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधित मृत्यू ससून रुग्णालयात

पुणे शहरातील एकूण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयात गेले आहेत. अडीच हजारापैकी 600 जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याची माहिती आहे. ससूनमध्ये क्रिटिकल रुग्णांना उपचारासाठी पाठवलं जात असल्यामुळे ससूनमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. सध्या 477 रुग्णांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 6 हजार 498 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यूची संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. (pune lockdown extended till may 15)

संबंधित बातम्या:

Pune Lockdown Latest News : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार

पुण्यात अजितदादांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, चंद्रकांतदादांनाही बोलावणं धाडलं, लॉकडाऊनच्या हालाचालींना वेग

गिरणगावातील चाळीतून थेट कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत मजल; आशिष शेलारांबाबतच्या ‘या’ गोष्टी माहीत आहे काय?

(pune lockdown extended till may 15)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.