Breaking: कोविन ॲप रजिस्ट्रेशन पोर्टलचा सर्व्हर डाऊन, ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी

Breaking: कोविन ॲप रजिस्ट्रेशन पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला असून ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी नागरीक करत आहेत. Cowin App server issues

Breaking: कोविन ॲप रजिस्ट्रेशन पोर्टलचा सर्व्हर डाऊन, ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी
कोविन ॲप

मुंबई: देशात 1 मे पासून कोरोनावरील लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वर्षांच्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्यास आजपासून सुरुवात झाली. मात्र, कोविन ॲपच्या सर्व्हरला प्रॉब्लेम आला असून वेबसाईट काही वेळ क्रॅश देखील झाली होती. काही वेळा ॲप आणि पोर्टलवर मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर ओटीपी येण्यात देखील अडचण येत होती. (Cowin App portal and app of corona vaccination registration faces server issues after registration opens for citizens 18 years old and above)

नेटकऱ्यांकडून संताप

काही नेटकऱ्यांनी कोविन ॲप  पोर्टल डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या

18 ते 44 वर्षांमधील व्यक्तींसाठी आजपासून नोंदणी सुरु

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान 18 वर्षांवरील सर्व लोकांना 1 मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी 28 एप्रिल म्हणजेच  आजपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केलेय. 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही.

नोंदणी कशी करावी?

पीआयबीने सरकारच्यावतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिलीय. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.

येथे संपूर्ण प्रक्रिया

पोर्टलवर नोंदणीचा ​​एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.
येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो 180 सेकंदात टाईप करावा लागेल.
नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.
आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.
या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या
नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.
यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.
केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.
“तुमचा नंबर आला की जा आणि लस घ्या.

संबंधित बातम्या:

18 वर्षावरील व्यक्तींसाठी लस नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशन केल्याशिवाय नंबर येणार नाही, एका क्लिकवर सर्व माहिती

धोका वाढला! राज्यात कोरोनानं 895 जणांचा मृत्यू, आज 66,358 नवे रुग्ण सापडले

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची आत्महत्या; इमारतीवरून मारली उडी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI