Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
महाराष्ट्रासह देशभरात साखरेचा तुटवडा जाणवत असून, सणासुदीत मागणी वाढल्याने रिटेलर्सनी खरेदीवर मर्यादा आणली आहे. D-Mart, BigBasket, Blinkit सारख्या कंपन्या 5 किलोपेक्षा जास्त साखर देत नाहीत. यामुळे ग्राहकांना झळ सोसावी लागत आहे आणि साखरेच्या दरात 40% वाढ झाली आहे. सरकार 10 लाख टन साखर आयात करणार आहे, तरीही भाववाढीची शक्यता आहे.

महाराष्ट्रसह देशभरात साखर महागली आहे. साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर महागली आहे. तसेच देशात सण उत्सवाचा काळ असल्याने साखरेची मागणी अधिक वाढणार आहे. साखरेचा तुटवडा आणि वाढती मागणी या पार्श्वभूमीवर D-Mart सारखे रिटेलर्स आणि BigBasket, Blinkit तसेच Swiggy Instamart सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मने ग्राहकांच्या साखर खरेदीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. साखरेच्या कमतरतेमुळे गेल्या दोन महिन्यात साखरेच्या रिटेल किंमतीमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही रिटेलर्सनी केवळ 3 ते 5 किलो साखर देण्यास सुरुवात केली आहे. त्यापेक्षा अधिक साखर खरेदी करण्यास बंदी घातली आहे. पॅकेज्ड फूड बनविणाऱ्या कंपन्यांना केवळ साखरच नव्हे तर गोडातेलासाठीही अधिक किंमत मोजावी लागत असतानाच कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना मात्र, साखरेची टंचाई भासणार आहे.
साधारणपणे सणासुदीच्या काळात तेलाची मागणी अधिक वाढते. मॅन्यूफॅक्चरर्स किंमती कमीत कमी पाच ते सहा टक्क्याने वाढवण्याची तयारी करत आहेत. साखरेच्या किंमती अधिक वाढल्या तर तेलाच्या किंमतीतही अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे किंमती सुमारे 5 टक्क्यांनी वाढवण्यापलिकडे काही मार्गच नाहीये, असं देशातील प्रमुख स्नॅक्स फूड बनवणारी कंपनीच्या प्रमुखाने स्पष्ट केलंय.
रेशनिंग करण्याची प्रक्रिया
भारताने किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात 10 लाख टन साखर आयात करण्यास मंजुरी दिली होती. ईटीच्या रिपोर्टनुसार, अनेक रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या स्टॉकला 1 किलोचे दोन ते तीन पॅक वा 5 किलोचा एक पॅकपर्यंत मर्यादित करत आहे. म्हणजे या कंपन्या ग्राहकाला केवळ पाच किलोच साखर देणार आहे. त्यावर साखर देणार नाही.
AWL अॅग्रीबिजनेसचे एक्झिक्युटिव्ह डेप्युटी चेअरमन अंगसू मल्लिक यांच्या मते, अनेक रिटेल चेनने प्रति ग्राहक साखरेच्या पाऊचच्या संख्येवर मर्यादा लावली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना त्यांच्या चेनमधून सामान खरेदी करता यावं, यासाठी हा निर्णय घेतला आहे.
AWL आणि श्री रेणुका शुगर्समध्ये विल्मर इंटरनॅशनल मोठी भागिदारी आहे. AWL आणिरेणुका ने रेणुकाच्या ‘मधुर’ ब्रँडच्या साखरेच्या मार्केटिंगसाठी भागिदारी आहे.
दिल्ली-NCRमध्ये, क्विक कॉमर्स प्लेटफॉर्म Blinkit ने मावाना प्रीमियम क्रिस्टल शुगर आणि धामपूर क्रिस्टल व्हाइट शुगर सारख्या ब्रँडसाठी प्रति ट्रँजेक्शन 5 किलोच्या एका पॅकपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. सोबतच, माफ करा, आमच्याकडे या वस्तूच्या मर्यादित मात्राच उपलब्ध आहेत, असं डिस्क्लेमरही दिलं आहे.
पुण्यात ब्लिंकिट कस्टमर्सला शॉपिंग कार्टमध्ये 1-1 किलोच्या केवळ तीन पॅक जोडण्याची परवानगी देत आहे. तर बिग बास्केटने काही खास ब्रँड्ससाठी 1-1 किलोच्या पाच पॅकपर्यंत खरेदीची मर्यादा ठेवली आहे.
दिल्ली-NCRमध्ये स्विगी इंस्टामार्टवर, सुप्रीम हार्वेस्ट क्रिस्टल शुगरसाठी 1-1 किलोचे दोन पॅक आणि मधुर शुगरसाठीही 1-1 किलोच्या दोन पॅकची मर्यादा ठेवली आहे.
तुम्ही आमच्या इनव्हाईसवर 5 किलो साखर खरेदी करू शकता. असुविधेसाठी खेद आहे, असं सुपरमार्केट चेन डी-मार्टच्या पुणे स्टोरच्या एका बोर्डवर लिहिलं होतं.