AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim | बॉम्बस्फोट, हत्या, ड्रग तस्करी… दाऊदने भारतात काय-काय गुन्हे केले ?

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर दाऊद आहे. बऱ्याच काळापासून तो पाकिस्तानमध्ये ठाण मांडून बसल्याचे माहीत असून तो आत्तापर्यंत पकडला गेलेला नाही.

Dawood Ibrahim | बॉम्बस्फोट, हत्या, ड्रग तस्करी... दाऊदने भारतात काय-काय गुन्हे केले ?
| Updated on: Dec 18, 2023 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली | 18 डिसेंबर 2023 : भारतातील मोस्ट वाँटेड आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषप्रयोग झाल्याच्या बातमीने संपूर्ण जग हादरलं. पाकिस्तानी पत्रकार आरजू कासमीने दाऊदची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिली आहे. मात्र दाऊदच्या तब्येतीबाबत कोणतीही बातमी बाहेर जाऊ नये, यासाठी संपूर्ण पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये गूगल सर्व्हिस, ट्वविटरसह संपूर्ण सोशल मीडिया डाऊन आहे. याचे दाऊदच्या तब्येतीशीच कनेक्शन आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर दाऊद आहे. बऱ्याच काळापासून तो पाकिस्तानमध्ये ठाण मांडून बसल्याचे माहीत असून तो आत्तापर्यंत पकडला गेलेला नाही. भारताने त्याच्या विरोधात शेकडो पुरावे देऊनही पाकिस्तानने दाऊद त्यांच्या भूमीत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला, त्यांनी वारंवार हे दावे फेटाळले. दाऊद इब्राहिमच्या गुन्ह्यांची यादी तर खूपच मोठी आहे. भारतात, त्याने काय गुन्हे केले आहेत, ते जाणून घेऊया,

दहशतवाद आणि बॉम्बस्फोट

1993 च्या बॉम्बस्फोटातील त्याच्या भूमिकेसाठी दाऊद हा नेहमीच भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. 1993 साली मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्य किमान 250 लोकांचा मृत्यू झाला, त्या स्फोटांचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमच होता. गेल्या वर्षीच भारताच्या तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले होते ज्यात पाच जणांवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात, जागतिक दहशतवादी नेटवर्क चालवणे आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग या मुद्द्याला आधार देण्यात आला. दहशतवादी कारवायांबाबत बोलायचं झालं तर अल कायदा आणि लश्करशीही दाऊदचे संबंध असल्याची चर्चा होती.

पैसे उकळण्यासाठी शोधल्या अनेक क्लुप्त्या

एका पोलिसवाल्याचा मुलगा असलेला दाऊद इब्राहिम कासकर, हा सुरूवातीपासूनच चुकीच्या संगतीला लागला. चोरी, दरोडा आणि तस्करीने त्याने सुरुवात केली. मात्र काही काळाने तो तत्कालीन कुख्यात डॉन करीम लाला गँगच्या संपर्कात आला. मग काय, पैसे उकळणारा दाऊद सट्टेबाजी, चित्रपटांना वित्तपुरवठा आणि इतर अवैध धंद्यात उतरू लागला. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि निर्मात्यांकडून दाऊद पैसे उकळू लागला. खंडणीतून कमावलेली रक्कम त्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचे सांगितले जाते. सर्व हवाला व्यवसायात त्याचा हातखंडा होता. जिथे बेकायदेशीरपणे देशाबाहेर पैसे पाठवले जात होते.

टार्गेट किलींग

1981 साली दाऊदचा भाऊ साबीर इब्राहिम कासकर याची हत्या झाली. साबीरवर चार जणांनी पाच गोळ्या झाडल्या. भावाच्या हत्येमुळे भडकलेल्या दाऊदने नंतर गोळीबार सुरूच ठेवला. 1986 मध्ये तो देश सोडून गेला, तरी त्याचे गुंड मुंबईत सर्वत्र राहिले. त्याने डी कंपनीच्या टोळीमार्फत टार्गेट किलिंग सुरू केल्याचे बोलले जाते. आपल्या भावाची हत्या करणाऱ्या पठाण टोळीतील सर्व सदस्यांना ठार मारण्याचे आदेश दाऊदने दिले होते. त्यानंतर एकेक हत्या सुरू झाल्या. त्यानंतर या गुंडांची मुंबईवरील पकड कमकुवत करण्यासाठी मुंबई पोलिसांना तब्बल दोन दशकं लागली. एकूण 900 चकमकी झाल्यानंतरच परिस्थिती थोडी सुधारली.

ड्रग तस्करी

दाऊद इब्राहिम हा अफू आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा धंदाही करत होता. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था यांच्याशी हातमिळवणी करून दाऊद जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करत होता. ड्रग्जमधून कमावलेल्या पैशातून तो आपली महागडी, आलिशान जीवनशैली जगत राहिला आणि त्याचप्रमाणे त्याने पाकिस्तानी सुरक्षा एजन्सींना पैसेही पुरवले. अमली पदार्थांच्या तस्करीचा बहुतांश व्यवसाय दाऊदने केला होता. त्यातून दाऊदने आपली शक्ती बळकट केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.