AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भात मोठा गौप्यस्फोट, NIA मिळाली महत्वाची माहिती

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानी आहे. तसेच पहिल्या पत्नीलाही त्याने तलाक दिला नाही. दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर ही माहिती दिली.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भात मोठा गौप्यस्फोट, NIA मिळाली महत्वाची माहिती
DAWOODImage Credit source: DAWOOD
| Updated on: Jan 17, 2023 | 2:43 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील तपास संस्थांना अनेक वर्षांपासून गुंगारा देणारा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम संदर्भातील महत्वाची माहिती समोर आली आहे. दाऊदचा भाच्याने राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA ला त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यापासून त्याच्या लग्नापर्यंतची माहिती दिली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानी आहे. तसेच पहिल्या पत्नीलाही त्याने तलाक दिला नाही. दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर ही माहिती दिली. एनआयए अंडरवर्ल्ड टेरर फंडीगसंदर्भात तिची चौकशी करत आहे. त्यावेळी अनेक गौप्यस्फोट त्याने केले. आता एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये अलीशाहचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदवला आहे.

तपास यंत्रणेने काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टेरर नेटवर्कचा भांडाफोड केला. त्यावेळी मुंबईसह काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात काही जणांना अटक केली होती. त्यानंतर तपास यंत्रणेने हसीनाचा मुलगा अलीशाह याचा सप्टेंबर २०२२ मध्ये जबाब नोंदवला होता. त्यात अलीशाहने अनेक गौप्यस्फोट केले आहे. दाऊदची दुसरी पत्नी पाकिस्तानमधील एका पठाण कुटुंबातील आहे. दाऊदच्या पहिली पत्नी महजबीनने ही माहिती अलीशाहा दिल्याचा त्याने दावा केला आहे. विशेषतः दाऊदने दुसरा निकाह करण्यापूर्वी पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला नाही.

काय मिळाली NIA माहिती

भारतीय तपास यंत्रणांचे लक्ष्य महजबींनवरून हटवण्यासाठी दाऊदने दुसरे लग्न केले होते. जुलै 2022 मध्ये त्याने हे लग्न गेले. दुबईला त्याची महजबीनशी भेट झाली होती. या भेटीनंतर महजबीन व दाऊदचे लग्न झाले. महजबीन प्रत्येक सणाला आपल्या भारतातील नातलगांशी व्हॉट्सएपवरून संवाद साधते.

ठिकाणाही बदलला दाऊद इब्राहिम स्वत: कोणाशी संपर्क करत नाही. आपल्या नातेवाईकांशी तो महजबीनच्या मार्फत बोलतो. दाऊदने त्यांच्या राहण्याचा ठिकाणीही बदलला आहे. आता तो कराचीतच वास्तव्यास आहे. कराचीतील गाझी बाबा दर्गालगतच्या डिफेन्स परिसरात तो राहत आहे. NIAने दावा केला होता की, दाऊद हवालाच्या माध्यमातून मोठी रक्कम भारतात डी कंपनीच्या कारवायांत मदत करणाऱ्यांना पाठवते.

कोण आहे दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म डिसेंबर १९५५ मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. नंतर दाऊद इब्राहिमचे कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झाले. 70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने पुढे येऊ लागले. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले. त्याला त्याचे प्रमुख मानले जात असे. १९९० मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा तो सूत्रधार होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर तो भारतातून पसार झाला. १९९० पासून तो पाकिस्तानात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.