December 2026 Wedding Dates : डिसेंबरमध्ये लग्नाचा बार उडवायचाय? मग उशीर नको, कारण डिसेंबरमध्ये मुहूर्त फक्त
तुळशीच्या लग्नानंतर सर्व शुभ कार्याला सुरूवात होते. जर तुम्ही डिसेंबरमध्ये लग्नाची तारीख ठरवत असाल तर तुमच्यासाठी शुभ तारखांबाबत मुहूर्तांबाबत एक घाई करायला लावणारी बातमी आ

तुळशीच्या लग्नानंतर सर्व शुभ कार्याला सुरूवात होते. जर तुम्ही डिसेंबरमध्ये लग्नाची तारीख ठरवत असाल तर तुमच्यासाठी शुभ तारखांबाबत मुहूर्तांबाबत एक घाई करायला लावणारी बातमी आहे. डिसेंबरमध्ये लग्नासाठी कमी शुभ तारखा आहेत. जे लोक लग्नाची तयारी सुरू करणार आहेत किंवा ज्यांचा साखरपुडा निश्चित झाला आहे, ते डिसेंबरच्या या शुभ तारखांच्या आधारे आपल्या लग्नाचे नियोजन पटापट करावे लागणार आहे.
विवाहासारखे शुभ प्रसंग एक विशेष विधी मानले जातात. त्यामुळे, लग्नाची तारीख निश्चित करताना शुभ मुहूर्त, दिवस आणि राशिभविष्य यांसारख्या अनेक घटकांचा विचार केला जातो. असे मानले जाते की शुभ मुहूर्तावर विवाह केल्याने वैवाहिक जीवन अधिक सुखकर होते आणि जोडप्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतात.
डिसेंबर २०२६ मधील विवाहासाठीच्या मुहूर्त लक्षात घ्या
1. पहिली तारीख 2 डिसेंबर, 2026 आहे. हा दिवस बुधवार असेल.
2. विवाहासाठी दुसरी शुभ तारीख 3 डिसेंबर 2026 आहे. हा दिवस गुरुवार असेल.
3. तिसरी शुभ तारीख 4 डिसेंबर, 2026 आहे . हा दिवस शुक्रवार असेल.
4. विवाहासाठी चौथी शुभ तारीख 5 डिसेंबर 2026 आहे . हा दिवस शनिवार असेल.
5. पाचवी शुभ तारीख 6 डिसेंबर , 2026 आहे. हा दिवस रविवार आहे.
6. सहावी तारीख 11 डिसेंबर, 2026 आहे . हा दिवस शुक्रवार असेल.
7. विवाहासाठी सातवी शुभ तारीख 12 डिसेंबर, 2026 आहे. हा दिवस शनिवार असेल.
खरमास 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे
पंचांगानुसार, खरमास 16 डिसेंबर रोजी सुरू होईल. या दिवशी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. असे मानले जाते की खरमास काळात कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ असते. त्यामुळे, या काळात विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्यक्रम केले जात नाहीत. खर्मस 14 जानेवारी 2027 रोजी संपेल. यानंतर, विवाहासाठी शुभ तारखा पुन्हा मिळू लागतील. डिसेंबरमध्ये, लोकांना फक्त 12 डिसेंबरपर्यंतच शुभ वेळ शोधण्याची संधी मिळेल. विवाहाचे नियोजन याच तारखांच्या आत करावे लागेल.