जंतर मंतरवरून जायचे की नाही अडीच तासात फैसला, दिल्लीत घडामोडींना वेग..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभर आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच आता नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली. आज जंतर मंतर येथील आंदोलनाचा फैसला होणार आहे. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी तयार आहे.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभर आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे हजारो विद्यार्थी आपले घरदार सोडून न्यायासाठी आलेत. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा व्हिडीओ शेअर करत मसुदा तयार केला जाणार मंत्रिमंडळात चर्चा यावर होणार आहे. संसदेत हा विषय मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. कठोर पाऊले पेपरफुटीविरोधात उचलली जात असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले. मात्र, जंतर मंतरवरील आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरूच राहणार असल्याचे अभिजीत दिपके याने म्हटले. सोनम वांगचूक यांनी अखेर 26 दिवसानंतर आपले उपोषण सोडले आहे, हे सरकारला मोठे यश आले. मात्र, अभिजीत दिपके शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर अजूनही ठाम आहेत.
सरकारने आंदोलकांना चर्चेसाठी प्रस्ताव दिला. 24 तासात 4 प्रस्ताव देण्यात आली. यादरम्यानच आता अखेर आंदोलक चर्चेसाठी तयार झालीत. आज मोठा फैसला होईल. दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आज दुपारी 12.30 वाजता केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेणार आहे.
शिष्टमंडळ सरकारसमोर आपल्या 4 मागण्या मांडणार आहेत. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी यांनी अखेर सरकारचा प्रस्ताव मान्य केला. सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा होणार आहे. सरकारकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, वेळ आणि दिवस तुम्ही ठरवा.. त्यानंतर अखेर चर्चा होत आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीपर्यंत मर्यादित राहिले नाही. देशातील अनेक शहरांमध्ये हे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून प्रत्येक प्रयत्न केली जात आहेत. आज कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमधील चर्चा यशस्वी ठरते का? आणि कॉकरोच जनता पार्टी आपले आंदोलन मागे घेते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.