Delhi Blast : दिल्ली स्फोटाप्रकरणी महत्वाचा पुरावा, दहशतवादी उमरचा खळबळजनक व्हिडीओ समोर; थेट म्हणाला..

Delhi Car Blast Case : दिल्लीत गेल्या सोमवारी संध्याकाळी कार स्फोट झाला. त्यापूर्वीच दहशतवादी डॉ. उमरने एक व्हिडीओ तयार केला होता, जो आता समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो सुसाईड बॉम्बिंगबद्दल बोलताना दिसला.

Delhi Blast : दिल्ली स्फोटाप्रकरणी महत्वाचा पुरावा, दहशतवादी उमरचा खळबळजनक व्हिडीओ समोर; थेट म्हणाला..
डॉ. उमरचा व्हिडीओ समोर
| Updated on: Nov 18, 2025 | 9:37 AM

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भयानक स्फोट (Delhi Blast) झाला, त्यात 12 ठार तर अनेक जण जखमी झाले. या स्फोटाप्रकरणी सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत असून त्यांना एक महत्वाचा पुरावा सापडला. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरचा रहिवासी दहशतवादी डॉ. उमर याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीमुळे संपूर्ण केसला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. कारण त्या व्हिडीओत उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.

सूत्रांच्या सांगण्यावुसार, दिल्लीत स्फोट घडवण्यापूर्वी उमरने स्वत:च हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमधून उमरचे विचार, योजना आणि कट्टरपंथी विचारसरणी उघड होते, असे तपास पथकाचे मानणे आहे. तसंच तो बऱ्याच काळापासून अशा हल्ल्याची तयारी करत होता हे देखील यावरून दिसून येत असल्याचं तपास पथकाचं म्हणणं आहे.

व्हिडीओत काय म्हणाला उमर ?

या व्हिडीओत दहशतवादी उर एक खुर्चीत बसल्याचे दिसत असून त्याच्यामागे कपाटासारखं काही आहे, समोर ठेवलेल्या कॅमेऱ्यात थेट पाहून उमरने त्याचं बोलणं रेकॉर्ड केलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ” सर्वात मोठी गैरसमजूत म्हणजे, सुसाईड बॉम्बिग किवा आत्मघाती स्फोट, लोकांना ते समजत नाही. ते कोणत्याही प्रकारे लोकशाहीवादी नाही आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजात ते स्वीकारार्ह नाही. त्या विरोधात अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.”

पुढे उमर म्हणाला, ” आत्मघाती हल्ल्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे , जेव्हा एखादी व्यक्ती असं मानतो की तो एखाद्या निश्चित स्थानी आणि निश्चित वेळी मरणार आहे, तेव्हा तो एका खतरनाक मानसिकतेत असतो. मृत्यू हीच आपली एकमेव मंजिल, एकमेव गंतव्य स्थन आहे, असं तो मानू लागतो. ”

पुढे तो सम्हाला ” पण खरं सांगायचं तर वास्तव हे आहे की अशी विचारसरणी किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही, कारण ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.” त्याच्या या रेकॉर्डेड संवादाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

तपासाता उमरच्या आईने काय दिली माहिती ?

दरम्यान तपास यंत्रणांनी दहशतवादी उमरच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मला बराच काळ संशय होता की माझा मुलगा कट्टरपंथी बनला आहे. तो अनेकदा कुटुंबाशी संपर्क न ठेवता दिवस घालवत असे, अस त्याच्या आईने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. दिल्ली स्फोटापूर्वी काही काळ आधी त्याने त्याच्या घरच्यांना थेट सांगितलं होतं की मला कॉल करू नका. उमरचा हा बदललेला स्वभाव दिसूनही त्याच्या कुटुंबियांनीयाबद्दल कधीच पोलिसांना माहिती दिली नाही.

दिल्लीतील आत्मघातकी स्फोटात उमरचा मृत्यू झाला, तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले. तो व्यवसायाने डॉक्टर होता पण तो गुप्तपणे आणि सक्रियपणे जैश-ए-मोहम्मदच्या एका मॉड्यूलमध्ये सहभागी होता. सोमवारी झालेल्या स्फोटापूर्वी पोलिसांनी त्याच्या टोळीतील अनेक सदस्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 2900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, ही टोळी मोठ्या हल्ल्याची तयारी करत होती हेच त्यावरून स्पष्ट होतं.