
राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर आता हा स्फोट कोणी, का कसा घडवला याचा तपास सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून तपास यंत्रणा आता सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहेत आणि जवळपासच्या अनेक भागातून डंप डेटा गोळा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांनी लाल किल्ल्याच्या परिसरात कार्यरत असलेल्या सर्व मोबाईल फोनवरून डंप डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.हा डंप डेटा कार स्फोटाशी संबंधित फोन नंबरचे संकेत देऊ शकतो असं एजन्सीचा विश्वास आहे. त्यामुळेच लाल किल्ला पार्किंग आणि त्याच्या आसपासच्या भागातील डंप डेटा गोळा केला जात आहे.
ज्या वाहनात स्फोट झाला त्या वाहनातील प्रवाशांनी एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संवाद साधला असावा, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. त्यामुळे पार्किंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व फोनमधील डेटा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच फरीदाबादमध्येदेखील आरोपींमध्ये काय संवाद झाला हे डंप डेटाद्वारे शोधले जात आहेत. यावरून किती लोक एकमेकांशी संवाद साधत होते हे उघड होईल.
डंप डेटा म्हणजे काय ?
नावाप्रमाणेच डंप डेटा म्हणजे असा डेटा ज्याची गरज नाही. या प्रकारचा डेटा सहसा शोधता येत नाही किंवा आवश्यकही नसतो. दररोज लाखो लोक मोबाईलवर बोलतात आणि गरज असल्याशिवाय त्यांचा डेटा वापरला जात नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा रॉ (Raw) डेटा आहे जो केवळ बॅकअप म्हणून वापरला जातो. तथापि, या डेटामध्ये रेकॉर्ड आणि इतर माहिती देखील समाविष्ट असते.
डंप डेटामधून केवळ कॉल रेकॉर्ड रिकव्हर करता येत नाहीत तर इतर प्रकारचा डेटा देखील पुन्हा मिळवता करतो. उदा – फोन किंवा लॅपटॉपमधून डिलीट झालेले व्हॉट्सॲप चॅट, गॅलरीतून डिलीट झालेले फोटो, कॉल रेकॉर्ड, एसएमएस (मेसेजेस) , गूगल किंवा इंटरनेट ब्राऊझर हिस्ट्री, इन्स्टाग्रामम,फेसबूक सह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील डेटाही रिकव्हर करता येऊ शकतो.
डेटा रिकव्हर करण्यास किती वेळ लागतो ?
जर एखाद्याकडे सामान्य अँड्रॉइड फोन असेल तर डंप डेटा रिकव्हर करण्यासाठी फक्त 2 ते 6 तास लागतात, परंतु आयफोनसारख्या आधुनिक मोबाईल फोनमधून हा डेटा 24 ते 72 तासांत रिकव्हर करता येतो. FSL अहवाल तयार होण्यास 15 दिवसांपासून ते 6 महिने लागू शकतात. याचा अर्थ असा की FSL द्वारे डेटा गोळा करण्यास वेळ लागू शकतो. शिवाय, जर एखाद्याचा फोन फॅक्टरी रीसेट झाला असेल आणि डेटा ओव्हरराईट झाला असेल तर तो रिकव्हर होत नाही. तसेच खूप जुना किंवा खराब फोन असेल किंवा त्याची चीप डॅमेज असेल तर त्यातूनही डेटा परत मिळत नाही.