Delhi Blast: दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवे वळण! चौथ्या लाल गाडीमुळे सुटणार कोडं, गाडीचा मालकही आला समोर

Delhi Blast: दिल्ली ब्लास्ट प्रकरण आणि फरीदाबाद दहशत मॉड्यूल प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अनेक दिवसांपासून शोध घेत असलेल्या चौथ्या ब्रेजा कारचा पत्ता लागला आहे. अल-फलाह विद्यापीठातून लाल रंगाची ब्रेजा कार जप्त करण्यात आली आहे. या गाडीमुळे अनेक कोडी सुटणार असल्याचे म्हटले जात आहे.

Delhi Blast: दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवे वळण! चौथ्या लाल गाडीमुळे सुटणार कोडं, गाडीचा मालकही आला समोर
Delhi blast
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 13, 2025 | 1:37 PM

दिल्ली कार ब्लास्टची कोडी आता सुटणार आहेत. या स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या गाड्या आता सापडताना दिसत आहेत. तसेच धोका निर्माण करणाऱ्या लाल ब्रेजा कारचा शोधही लागला आहे. होय, फरीदाबाद दहशत मॉड्यूलशी जोडलेली ही लाल ब्रेजा कार सापडली आहे, जिचा शोध पोलिसांनी घेतला होता. पोलिसांना ही लाल ब्रेजा कार अल-फलाह विद्यापीठात सापडली आहे. डॉक्टर दहशत मॉड्यूलमधील ही चौथी कार होती, जी आता पोलिसांच्या हाती लागली आहे. या गाडीत स्फोटक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या, कारची तपासणी सुरू आहे.

पोलिसांनी जप्त केली कार

सूत्रांनुसार, अल-फलाह विद्यापीठातून मिळालेल्या ब्रेजा कारची मालकीण डॉक्टर शाहीन आहे. होय, तीच डॉक्टर शाहीन जी फरीदाबाद डॉक्टर दहशत मॉड्यूलमध्ये पकडली गेली आहे. कार तिच्या नावावरच आहे. यापूर्वी मिळालेली एक डिझायर कारही दहशतवादी डॉक्टर शाहिनचीच होती. त्या डिझायर कारमध्ये एके-47 रायफल मिळाली होती. आता ही लाल ब्रेजा कारही तिच्याशी जोडली जात आहे.

चौथ्या कारमुळे उलघडणार सत्य

लाल किल्ला स्फोटाच्या तपासणीत दररोज नवीन वळण येत आहे. तपास यंत्रणांसमोर सर्वांत मोठा प्रश्न होता की चौथी कार म्हणजे ब्रेजा कार कुठे आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. तपास यंत्रणांना संशय होता की या ब्रेजा कारमध्ये शक्यतो ३०० किलोपर्यंत स्फोटक साहित्य ठेवले गेले असेल. ही चौथी ब्रेजा कार केवळ संपूर्ण सत्य समोर आणू शकते. पोलिसांनी ती जप्त केलेली कार तपासण्यास सुरुवात केली आहे.

डॉक्टर दहशतवादी मॉड्यूल आणि चार कार

फरीदाबाद डॉक्टर दहशत मॉड्यूलच्या तपासणीत आत्तापर्यंत चार कार समोर आल्या आहेत. एक शाहीनची डिझायर, दुसरी आय-२० जीचा स्फोट झाला आहे. तिसरी इको स्पोर्ट्स जी १२ नोव्हेंबरला जप्त झाली. चौथी ब्रेजा कार. सूत्रांनुसार, या गाड्यांचा वापर दिल्ली-एनसीआरमध्ये रेकी, स्फोटकांचा पुरवठा आणि दहशतवादी कटकारस्थानाची योजना आखण्यासाठी केला गेला होता.