
Delhi Car Blast Live Update: राजधानी दिल्लीत झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अर्लट जारी करण्यात आला आहे. तर या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने स्वीकारली आहे. दिल्लीत झालेला ब्लास्ट ऑपरेश सिंदूरचा बदला आहे.. असं सांगण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पण व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये किती तथ्य आहे… याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही…
पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर लष्कर-ए-तोयबा या नावाने प्रसारित केली जात आहे. पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे की ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय क्षेपणास्त्राने पीओकेमधील बिलाल मशिदीवर हल्ला केला, हा हल्ला त्याचाच बदला आहे.. तर पोलीस या पोस्टची चौकशी करत आहे..
पोस्टमध्ये पुढे लिहिण्यात आलं आहे की, ‘भारताची राजधानी दिल्लीनंतर आज 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता हल्ला करण्यात आले. हल्ला लष्कर-ए-तैयबाच्या शूर टायगर्सनी केला. काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधील बिलाल मशिदीतील शहीदांचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, जिथे 50 हून अधिक लोक मारले गेले होते. लष्कर-ए-तैयबा मशिदीच्या प्रत्येक विटेचा बदला घेईल… आणि प्रत्येक मंदिरापर्यंत पोहोचण्याची शपथ घेतो…. आता हे युद्ध असंच सुरु राहणार. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही आणि भारत नष्ट होत नाही…. ‘
स्फोटापूर्वी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या रंगाची आय20 कार बाहेर पडताना दिसत आहे, जी दहशतवादी डॉ. मोहम्मद उमर याची असल्याचा संशय आहे. हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 28 जण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक 21 – 58 वयोगटातील आहे… काही मृतदेहांचे अवयव रसत्यांवर विखुरलेले होते.
कारच्या मागील बाजूस स्फोट झाला आणि त्याचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या स्फोटात जवळच्या सहा कार, दोन ई-रिक्षा आणि एक ऑटो-रिक्षा जळून खाक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यात तीन लोक होते. ती कार हरियाणातील गुरुग्राममध्ये सलमानच्या नावावर होती.
पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सलमानने ती गाडी पुलवामा येथील तारिकला विकली होती. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत