CJP Protest: इंटरनेट ठप्प, अनेक रेल्वे रद्द, मेट्रो स्टेशन पण बंद, चौका चौकात पोलीस… CJP च्या प्रदर्शनापूर्वीच दिल्लीला छावणीचे स्वरूप

CJP Protest Delhi: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वीच दिल्लीत अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त दिसून आला. दिल्लीला जणू छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 200 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

CJP Protest: इंटरनेट ठप्प, अनेक रेल्वे रद्द, मेट्रो स्टेशन पण बंद, चौका चौकात पोलीस... CJP च्या प्रदर्शनापूर्वीच दिल्लीला छावणीचे स्वरूप
दिल्लीत सीजेपी आंदोलनापूर्वी छावणीचे स्वरूप
| Updated on: Oct 10, 2026 | 7:19 AM

CJP Protest Delhi: कॉकरोच जनता पार्टीने आज 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाची हाक अगोदरच दिली होती. या प्रदर्शनाच्या अगोदरच सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. अनेक भागातील इंटरनेट ठप्प पडलंय, अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास 75 रेल्वे आज धावणार नाही. मेट्रो स्टेशन बंद आहेत. नमो भारतचे दोन स्टेशन, दारुची दुकानं बंद करण्यात आली आहेत. तर चौका चौकात पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीला लष्कारी छावणीचे स्वरूप आले आहेत.

200 आंदोलक ताब्यात

Loading...

दरम्यान हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार रात्रीपासून ते आतापर्यंत पोलिसांनी 200 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी काही सीजेपी आंदोलकांना स्थानिक पोलिसांनी नोटीसा बजावल्याचा दावा पक्षाने केला आहे. काहीही झाले तरी दिल्ली गाठणार आणि जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचा निर्धार सीजेपी नेतृत्वाने व्यक्त केला आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी दिल्लीच्या सीमारेषांवर तगडा बंदोबस्त ठेवला आहे. विशेषतः पंजाब आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.

45 स्टेशन बंद, 75 रेल्वे रद्द

दिल्लीत आज सीजेपीच्या आंदोलनापूर्वी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त दिसला. दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्ली मेट्रोच्या स्टेशन बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. नवी दिल्ली, हजर निजामुद्दीन आणि टिळक ब्रिजसंबंधीत 75 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. काही परिसरातील इंटरनेट सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. याशिवाय नमो भारतचे दोन स्टेशन, दारूची दुकानं आणि भागीरथ पॅलेस बाजारही आज बंद असेल.

दिल्लीत कलम 163 लागू

अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीच्या प्रदर्शनाच्या अगोदरच पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) चे कलम 163 राजधानी दिल्लीत लागू करण्यात आले आहे. कलम 163 ने CrPC चे कलम 144 ची जागा घेतली आहे. याअतंर्गत अधिकारी हिंसा, दंगा, गैर कायदेशीर गर्दी, कायदा आणि सुव्यवस्था रोखण्यासाठी उपाय योजना करते. तर नवी दिल्लीमधील जनपथकर्तव्य मार्गाजवळील जवळपास 4 किलोमीटर परीघातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ही सेवा आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद असेल.

23,000 पोलिसांसह जवान तैनात

गृहमंत्रालयाने राष्ट्रीय राजधानीत आजच्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आगहे. दिल्ली पोलिसांची सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सची (CAPF) अतिरिक्त कंपनी देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर 2026 ते 12 ऑक्टोबर 2026 दरम्यान दिल्लीत जवळपास 23,000 पोलिसांसह जवान तैनात असतील. अनेक ठिकाणी बॅरेकेटिंग, CCTV चा पहारा असेल, तर फेशियल रिकग्निशन सिस्टिम (FRS) कॅमेऱ्यांचाही पोलीस वापर करणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us