लाडक्या बहिणींना मोठा झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मिळणार नाही एकही रुपया
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. परंतु ज्या महिलांना तीन पेक्षा जास्त आपत्य आहेत, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. परंतु या योजनेसाठी केवासीची सक्ती करण्यात आल्यानंतर या योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आलं आहे. दरम्यान आता दिल्लीमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्रासारखीच योजना दिल्लीमध्ये देखील आता सुरू झाली आहे. ‘दिल्ली लक्ष्मी’ योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून या योजनेचं आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान आता दिल्लीमध्ये सत्ता येताच हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिल्लीमधील भाजप सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मंगळवारी ‘दिल्ली लक्ष्मी’ योजनेला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ज्या महिलांचा समावेश हा अल्प उत्पन्न गटामध्ये होतो, त्या महिलांना 2500 रुपये सरकारच्या वतीने देण्यात येणार आहेत. परंतु इतर योजनेप्रमाणेच या योजनेसाठी देखील सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट म्हणजे ज्या महिलांना तीन पेक्षा अधिक मुलं आहेत, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून एकही रुपया दिला जाणार नाहीये.
काय आहेत अटी?
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांचं वय 21 ते 60 वर्षादरम्यान आहे, अशाच महिला पात्र असणार आहेत. या योजनेसाठी संबंधित महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तसेच संबंधित महिलेला तीन किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असावीत. जर एखाद्या महिलेला तीन पेक्षा जास्त मुलं असतील तर अशा महिलेला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. हे पैसे बँकेत न जमा करता या महिलांना कॅश स्वरुपात देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.