Maharashtra News LIVE : आज पुन्हा शिवसेना चिन्हावर सुनावणी, शिवसेना शिंदे गट मांडणार बाजू
आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस
काही वेळातच जरांगे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदाकडे रवाना होणार
मोर्चातील मराठा बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून 10 पेक्षा अधिक ट्रॅक्टर भरून हजारो पाणी बॉटलची व्यवस्था
मराठा बांधवांनी लोकवर्गणीमधून आणल्या पाण्याच्या बाटल्या
-
तुरीच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर
मोठ्या अपेक्षेने पिकवलेली तूर डोळ्यादेखत उद्ध्वस्त करण्याची वेळ धुळे तालुक्यातील शेतकऱ्यावर आली आहे. देऊर खुर्द येथील शेतकरी देवेंद्रसिंग रामसिंग गिरासे यांनी तीन एकर क्षेत्रात तुरीची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे तुरीचे पीक पूर्णपणे संकटात सापडले आहे. शेतकऱ्याने तुरीच्या उभ्या पिकावर रोटर फिरवला आहे.
-
आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. यावेळी ज्येष्ठ वकील नीरज कौल हे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पक्षाची बाजू न्यायालयात मांडणार आहेत, या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. परंतु अजूनही त्यांना मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळालेली नाहीये, राज्यात गणरायाच्या आगमनासोबतच पावसाचं देखील आगमन झालं आहे. राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. यासोबतच आपण विविध बातम्या आणि घडामोडी जाणून घेणार आहोत.
Published On - Sep 16,2026 8:35 AM
