AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंडागर्दी नही चलेगी… जंतरमंतरवर आंदोलन पेटलं; अनेकांची धरपकड सुरू

जंतरमंतरवर पुन्हा युवकांचे आंदोलन पेटले आहे. 'गुंडागर्दी नही चलेगी' घोषणांनी परिसर दणाणला. राहुल-प्रियंका गांधींच्या उपस्थितीमुळे आंदोलन अधिक तीव्र झाले, तर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर सुरू झालेल्या या आंदोलनाला आता राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत आहे.

गुंडागर्दी नही चलेगी... जंतरमंतरवर आंदोलन पेटलं; अनेकांची धरपकड सुरू
cjp protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 4:24 PM
Share

जंतरमंतरवर पुन्हा एकदा तरुणांनी एल्गार पुकारला आहे. कालचं आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. गुंडागर्दी नही चलेगी…च्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे वातावरण पुन्हा तापलं.

गेल्या 23 दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतरमंतरवर सुरू आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण मोडीत काढल्याने आंदोलक काल अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अनेक विद्यार्थी या आंदोलनात जखमी झाले. मुलींनाही प्रचंड मार लागला. अनेकांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे जंतरमंतरवरची परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

अन् आंदोलकांना पांगवलं…

संध्याकाळी या आंदोलकांना पांगवण्यात आलं होतं. आंदोलकांना पांगवल्यानंतर परत रात्री आंदोलक जंतरमंतरवर आले. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात काल पुन्हा आंदोलन सुरू झालं. रात्रभर हे आंदोलन सुरू होतं. आज सकाळीही आंदोलन सुरू होतं. पण दुपारनंतर हे आंदोलन अधिकच पेटलं. दुपारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आंदोलनस्थळी आले. त्यांनी मोदींच्या निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्याचवेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनस्थळी येऊन अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला.

तरीही घोषणा सुरूच…

राजकीय नेत्यांनी आंदोलन स्थळी धाव घेतल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारला प्रचंड धारेवर धरलं. गुंडागर्दी नही चलेगी, तानाशाही नही चलेगीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तरुणांना व्हॅनमध्ये कोंबल्यानंतरही त्यांच्या घोषणा सुरूच होत्या.

Follow Us
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी खळबळ! PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन,
LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या
सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील...
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची पहिली यादी
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा, तिकडे विरोधी पक्ष नेते थेट...
मतं घेताना लाज वाटली नाही का? खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
New Delhi CJP Protest | मतं घेताना लाज वाटली नाही का? सदाभाऊ खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

Abhijeet Dipke-Sharad Pawar :  शरद पवारांसमोर अभिजीत दीपके महाराष्ट्रातल्या विरोधकांबद्दल काय म्हणाले?.

Abhijeet Dipke-Sharad Pawar : शरद पवारांसमोर अभिजीत दीपके महाराष्ट्रातल्या विरोधकांबद्दल काय म्हणाले?

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचा भाव चांगलाच वाढला, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचा भाव चांगलाच वाढला, आज 10 ग्रॅमसाठी…

IND vs ZIM: ना Sony Liv, ना Jio Hotstar…मग झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या.

IND vs ZIM: ना Sony Liv, ना Jio Hotstar…मग झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या