Video: दिल्लीची जेव्हा मुंबई होते, संभाजी छत्रपतींच्या घरातही पाणी पाणी

| Updated on: Sep 02, 2021 | 3:32 PM

राजधानी नवी दिल्लीला पावसानं झोडपलं आहे. नवी दिल्लीत गेल्या 19 वर्षातील सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

Video: दिल्लीची जेव्हा मुंबई होते, संभाजी छत्रपतींच्या घरातही पाणी पाणी
नवी दिल्लीत जोरदार पाऊस
Follow us on

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीला पावसानं झोडपलं आहे. नवी दिल्लीत गेल्या 19 वर्षातील सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पावसाला झोडपल्यानंतर जशी स्थिती होते तशीच स्थिती नवी दिल्लीची झाल्याचं दिसून आलं आहे. खासदार संभाजी छत्रपती यांना देखील दिल्लीतल्या पावसाचा फटका बसला आहे. संभाजी छत्रपती यांच्या घरात पाणी घुसल्याचं समोर आलं आहे.

संभाजी छत्रपती काय म्हणाले?

मी कालचं दिल्लीत आलो असून सकाळी सहाच्या दरम्यान पाणी साचत असल्याचं समोर आलं. एवढं पाणी कधी भरेल असं वाटलं नव्हतं, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. आपल्याला इतकं पाणी साचलं तर त्रास होतो तर सामान्य जनतेला पुराच्या वेळी किती त्रास होतो याचा विचार केला पाहिजे, असं संभाजी छत्रपती म्हणाले. तर, या भागातील ड्रेनेज सिस्टीम बदलावी लागेल, असं त्यांनी म्हटलं.

नवी दिल्लीत रेकॉर्डब्रेक पाऊस

राजधानी नवी दिल्लीत सप्टेंबरच्या पहिल्या पावसात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. दिल्लीत बुधवारी 112.1 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या बारा वर्षातील एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. तर, 19 वर्षानंतर सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नवी दिल्लीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

दिल्लीतील नायगरा धबधबा, नेटकऱ्यांकडून व्हिडीओ शेअर

नवी दिल्लीतील एका उड्डाणपुलावर कोसळणऱ्या पाण्याचा व्हिडीओ शेअर करत दिल्लीतील नायगरा धबधबा अशी उपाहासात्मक टिप्पणी केली होती.

राजधानी नवी दिल्लीत यापूर्वी 13 सप्टेंबर 2002 ला 126.8 मिमी पावसाची नोंद झाली. नवी दिल्लीत सप्टेंबरमधील सर्वाधिक पावसाची नोंद 172.6 मिमी. पावसाची नोंद 16 सप्टेंबर 1963 रोजी झाली होती.

नवी दिल्लीतील पावसाचे फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या

केवळ महिला घरी असताना CBI घरात कशी घुसली, सुप्रिया सुळे कडाडल्या

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचा हार टाकून स्वागत करायचं का? : चंद्रकांत पाटील

मग तुम्ही अरुण जेटलींना राज्यसभेवर कसं घेतलं, राजू शेट्टींबाबतच्या तांत्रिक मुद्यावर अजित पवारांचं प्रश्नचिन्ह!

Delhi Record break rain created flooded situation like Mumbai Rajya Sabha MP Sambhaji Chhatrapati suffered due to water lodging