AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ महिला घरी असताना CBI घरात कशी घुसली, सुप्रिया सुळे कडाडल्या

महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेलं आहे.  सर्व्हे देखील आमच्या बाजूने आहेत, राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरं काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

केवळ महिला घरी असताना CBI घरात कशी घुसली, सुप्रिया सुळे कडाडल्या
Supriya Sule
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 2:07 PM
Share

मुंबई : आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे  (NCP MP Supriya Sule) यांनी केला. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. केवळ महिला घरात होत्या असं असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेलं आहे.  सर्व्हे देखील आमच्या बाजूने आहेत, राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरं काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

अशी दडपशाही पाहिली नाही

या आधी अशाप्रकारचं दडपशाहीचं काम मी पाहिलेले नाही, असा यंत्रणेचा वापर मी केव्हाही पाहिलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचं राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारं नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालायला हवा, ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही. पण आम्ही याच्याविरोधात पूर्ण ताकतीने लढू, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात

अनिल देशमुख यांचा जावई गौरव चतुर्वेदी यांना काल रात्री सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने काही काळ चौकशी करुन त्यांची सुटका केली. देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांच्या वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केलाय. सीबीआयच्या या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

VIDEO : सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

संबंधित बातम्या 

मग तुम्ही अरुण जेटलींना राज्यसभेवर कसं घेतलं, राजू शेट्टींबाबतच्या तांत्रिक मुद्यावर अजित पवारांचं प्रश्नचिन्ह!

अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी! महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.