मग तुम्ही अरुण जेटलींना राज्यसभेवर कसं घेतलं, राजू शेट्टींबाबतच्या तांत्रिक मुद्यावर अजित पवारांचं प्रश्नचिन्ह!

राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेवर घेता येतं की नाही, याबाबतचा नियम आता महाविकास आघाडीकडून तपासला जात आहे.

मग तुम्ही अरुण जेटलींना राज्यसभेवर कसं घेतलं, राजू शेट्टींबाबतच्या तांत्रिक मुद्यावर अजित पवारांचं प्रश्नचिन्ह!
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी
सुनील काळे

| Edited By: सचिन पाटील

Sep 02, 2021 | 1:18 PM

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. “आम्ही पहिली 12 नावं मंत्रिमंडळाने दिली. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं” असं अजित पवार म्हणाले.

राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेवर घेता येतं की नाही, याबाबतचा नियम आता महाविकास आघाडीकडून तपासला जात आहे.

याबाबत अजित पवार म्हणाले, “नाव बदललं ही चर्चा मी माध्यमात बघितली. नजिकच्या काळात पराभूत झालं तर नियुक्त केले जात नाही असे म्हणतात. पण अरुण जेटली पराभूत झाले तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्यसभेवर घेतलं. राज्यपाल नियुक्त करता येत नाही असं आम्हाला सांगण्यात आले, ते आम्ही तपासतो आहे”

अतिवृष्टीने नुकसान, तातडीच्या मदतीचे आदेश

दरम्यान, मराठवाड्यात आणि जळगाव, चाळीसगावमध्ये काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने मदत देण्याचे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यात पाहणीसाठी गेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनाही आदेश दिले आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.

औरंगाबाद- जळगाव दरम्यानच्या कन्नड घाटात दरड कोसळून प्रचंड नुकसान झालं. तिथे मोठे दगड पडले आहेत. त्याबाबत रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

राजू शेट्टींच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

दरम्यान, अजित पवार यांनी राजू शेट्टींच्या पंचगंगा परिक्रमा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. “आम्ही पूरग्रस्तांना मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केलीय. अशा प्रकारच्या मदतीच्या बाबतीत पालकमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पालकमंत्री तिथला प्रतिनिधी असतो. राजू शेट्टी यांची जी मागणी आहे, आम्हीही ग्रामीण भागातून येतो, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करतो. शेतकरी अडचणीत आला की शेतकर्‍यांना आमचे सरकार तातडीने मदत करत आलंय, असं अजित पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

12 आमदार नियुक्ती वाद, राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?

चंद्रकांत पाटील ठाकरेंना म्हणाले, खंजीर खुपसला, आता संजय राऊतांनी ‘बंद खोलीतील’ चर्चा बाहेर काढली!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें