डीलिमिटेशन बिल आल्यावर नेमकं काय होईल? घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी काय सांगितला धोका?

केंद्र सरकारचे डीलिमिटेशन बिलामुळे लोकसभेच्या 850 जागा होणार आहे. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या विधेयकाला लोकशाहीसाठी धोकादायक म्हटले आहे. त्यांच्या मते, यामुळे संघराज्य तत्त्वाला बाधा येईल आणि राज्यसभेचे महत्त्व कमी होईल, ज्यामुळे राज्यांचे प्रतिनिधित्व धोक्यात येईल. सर्वोच्च न्यायालयातील विलंबामुळे अनेक निवडणुका या नव्या व्यवस्थेत होतील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

डीलिमिटेशन बिल आल्यावर नेमकं काय होईल? घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी काय सांगितला धोका?
delimitation bill
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 3:00 PM

केंद्र सरकारने अखेर डीलिमिटेशन बिल संसदेत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. या विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आणि स्टॅलिन यांच्या डीएमकेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एनडीएचं बळ वाढलं आहे. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभेच्या जागा 850 होणार आहेत. त्यामुळे देशभरातील मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे. तसेच महिलांचं संसदेतील प्रतिनिधीत्त्वही वाढणार आहे. मात्र, हे विधेयक लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी या विधेयकाबाबतचा नेमका धोका सांगितला आहे.

या नव्या विधेयकामुळे लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. राज्यसभेच्या जागा तशाच राहणार आहेत. त्यामुळे राज्यसभेव अन्याय होणार नाही का? असा सवाल उल्हास बापट यांना विचारण्यात आला. त्यावर बापट यांनी थेट आणि मुद्देसूद उत्तर दिलं. हा मुद्दा आतापर्यंत कोणी मांडला नाही. मला या विधेयकावर शंका आहे. कारण त्यात संघराज्य तत्त्वावर बाधा येईल. राज्यसभेत आतात 250 सदस्य आहेत. लोकसभेचे 850 होतील. कोणत्याही घटना दुरुस्ती विधेयकाला स्वतंत्रपणे दोन्ही सभागृहात दोन तृतियांश बहुमत असावे लागते. सामान्य विधेयकाबाबत मतभेद असेल तर 108 कलमाखाली ज्वॉइंट सिटिंग घेता येते. तिथे दोन्ही सदस्य एकत्र बसून मॅजोरिटी बघितली जाणार. म्हणजे लोकसभेतील मत मान्य होणार. राज्यसभेला काही महत्त्व उरणार नाही, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.

Loading...

तोपर्यंत दोन चार निवडणुका होतील

हे विधेयक घटनाबाह्य आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात कुणी तरी आव्हान देईल. पण आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय निकाल द्यायला पाच सात वर्ष लावतं. त्यामुळे दोन चार इलेक्शन होऊन जातील, असं सांगतानाच लोकसभेत लोकांचे, तर राज्यसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व असते. राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होणे हा घटनात्मक प्रश्न आहे. परिसीमन आणि घटनात्मक प्रक्रियेतील गोंधळामुळे भारतीय लोकशाहीला मोठा धोका निर्माण होत असल्याचे मतही बापट यांनी व्यक्त केलं.

डीलिमेटशन विधेयक काय आहे?

डीलिमिटेशन म्हणजे परिसीमनचा अर्थ म्हणजे देशात राज्यातील लोकसभा वा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघाच्या सीमा ठरवणे वा त्या वाढवणे. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे, कोणता भाग कोणत्या लोकसभा वा विधानसभा क्षेत्रात येईल हे पाहणं. परिसीमन का केलं जातं? हा सवाल होणं स्वाभाविक आहे. काळानुसार लोकसंख्या वाढत असते वा कमी होते. एखाद्या क्षेत्रात लोकसंख्या अधिक आणि दुसऱ्या क्षेत्रात लोकसंख्या कमी असेल तर कोणत्या तरी एका क्षेत्रावर अन्याय होतो. त्यामुळे प्रतिनिधित्व असमान होते. त्यामुळे सर्वच क्षेत्रात लोकसंख्येचं प्रमाण समान ठेवण्यासाठी परिसीमन केलं जातं. याच लोकसंख्येच्या आधारावर एससी आणि एसटीसाठीही जागा आरक्षित ठेवल्या जातात. परिसीमनाच्या माध्यामातून मतदारसंघाची सीमा निश्चित होते, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करणं सोपं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us