डॉक्टराचा ब्रेकअप झाला, डिप्रेशनमध्ये गेला, मर्सिडीज बंद करुन लावली आग

| Updated on: Jan 31, 2023 | 8:48 AM

काव्या निघून गेल्याचा राग कवीनला आला. यामुळे तो त्याच्या मर्सिडीज बेंझ कारमध्ये बसला आणि गाडीला आग लावली.

डॉक्टराचा ब्रेकअप झाला, डिप्रेशनमध्ये गेला, मर्सिडीज बंद करुन लावली आग
पोलीस
Follow us on

चेन्नई : आपल्या रागावर नेहमी नियंत्रण हवे असते. नाहीतर राग आल्याच्या त्या काही सेंकदात व्यक्ती काहीही करु शकतो. त्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. काही वेळा प्राणसुद्धा जाऊ शकतll. चेन्नईतील डॉक्टराने जे केले ते इतरांना धडा देणारे आहे. चेन्नईमधील २९ वर्षीय डॉक्टर कवीन. त्याने मागील वर्षीच एका खाजगी महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करु लागला.

मैत्री अन् ब्रेकअप

कांचीपुरममध्ये राहणारी काव्या कवीनची मैत्रीण. दोघांची कॉलेजपासूनची मैत्री होती. काव्या सध्या एका खाजगी दवाखान्यात काम करते. दोन दिवसांपुर्वी कविनने काव्याला सोबत घेतले. दोघं ५० लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून लाँग ड्राइव्हला गेले. कांजीपूरम जिल्ह्यातील राजाकुलम तलावाजवळील निर्जन भागात ते गप्पा मारत बसले. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. काही कारणांवरुन काव्या-कवीनमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात ब्रेकअप झाले.  काव्या निघून गेली.

हे सुद्धा वाचा

आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांच्या संशयानुसार, काव्या निघून गेल्याचा राग कवीनला आला. यामुळे तो त्याच्या मर्सिडीज बेंझ कारमध्ये बसला आणि गाडीला आग लावली. परंतु धुरामुळे त्याला थांबणे अशक्य झाले. यामुळे तो लगेच बाहेर पडला. परंतु थोड्या वेळात मर्सिडीजची राख रांगोळी झाली. गाडीला आग लागल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. कांचीपुरम पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. सध्या पोलिसांनी कावीनची जामिनावर सुटका केली आहे. कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेकअप झाल्यामुळे डिप्रेशन

दोघांचा भांडणात डॉक्टरचा ब्रेकअप झाला होता. यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. आपल्या मैत्रिणीला विसरू शकला नाही, या विचारामुळे त्याने मर्सिडीजला आग लावली. परंतु ब्रेकअपमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणे भ्याडपणाचे लक्षण आहे.

नैराश्य आले तर येथे करा संपर्क

वंद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्‍थ 9999666555
022-25521111 (सोमवार ते शनिवार, सकाळी 8:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत)

तुम्ही खालील पत्यावर मेलसुद्धा लिहू शकतात

help@vandrevalafoundation.com