रेल्वेचा झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे? प्रवाशांवर काय परिणाम होणार ?

| Updated on: Dec 19, 2020 | 6:19 PM

भारतीय रेल्वे विभागाने 1 डिसेंबर 2020 पासून झिरो बेस्ड टाईमटेबल (zero-based timetable) लागू केला आहे. (indian railway timetable)

रेल्वेचा झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे? प्रवाशांवर काय परिणाम होणार ?
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे विभागाने 1 डिसेंबर 2020 पासून झिरो बेस्ड टाईमटेबल (zero-based timetable) लागू केला आहे. रेल्वेचे हे नवे वेळापत्रक संपूर्ण देशभरात लागू झाले आहे. हे वेळापत्रक लागू झाल्यानंतर देशातील अनेक रेल्वेंचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे तुम्ही कुठे प्रवास करु इच्छित असाल तर, आधी रेल्वेचे नवे वेळापत्रक नक्की बघून घ्या. नव्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती भारतीय रेल्वे विभागाच्या www.indianrail.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. (detail information of zero based timetable of indian railway)

झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे?

रेल्वे विभागाकडून दरवर्षी रेल्वेंचे नवे वेळापत्रक तयार केले जाते. झिरो बेस्ड टाईमटेबल तयार करताना संपूर्ण देशातील रेल्वे ट्रॅकवर एकही रेल्वे धावत नसल्याचे गृहीत धरले जाते. त्यानंतर प्रत्येक रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्या येते. एखादी रेल्वे कुठे थांबणार, कधी आणि कोणत्या वेळेत थांबणार या सर्वांच्या वेळा निश्चित केल्या जातात. यावेळी एका रेल्वेमुळे दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक बिघडू नये याची विशेष काळजी घेतली जाते. झिरो बेस्ड टाईमटेबल तयार करताना रेल्वे विभागाने आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांची मदत घेतली आहे. देशात लॉकडाऊन सुरु असतानाच या टाईमटेबलवर रेल्वे विभागाने आपले काम सुरु केले होते.

कोरोना महामारीमुळे वेळापत्रकाला उशीर

रेल्वे विभागाकडून नवे वेळापत्रक दरवर्षी जुलै महिन्यात जाहीर केले जाते. मात्र, यावेळी कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. देशात दरवर्षी अनेक रेल्वेगाड्या नव्याने सुरु होतात. या सर्व रेल्वेंना वेळापत्रकात स्थान द्यावे लागते. याच कारणामुळे रेल्वे विभागाला दरवर्षी नवे वेळापत्रक जाहीर करावे लागते. रेल्वे विभागाकडून दरवर्षी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असले तरी, रेल्वेच्या वेळापत्रकात जास्त फरक पडत नाही. कुठल्याही रेल्वेच्या प्रवासामध्ये फारतर 5 किंवा 15 मिनिटांचा फकर पडतो.

रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार

यावेळी नव्या झिरो बेस्ड टाईमटेबलनुसार आवश्यकता नसलेल्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, गरज नसलेले थांबेही यावेळी रद्द कले जातील. त्यामुळे नव्या वेळापत्रकांनुसार रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. सामान्यत: रेल्वेगाड्यांचा वेग प्रतितास 55 किलोमीटर इतका असतो. यानंतर, रेल्वेंचा वेग वाढल्यामुळे उत्पन्नातही वाढ होणार आहे.

रेल्वेच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वेळापत्रकामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही वाढ जवळपास 1500 कोटी रुपये असेल. विशेष म्हणजे ही वाढ कुठलेही रेल्वेभाडे न वाढवता असणार आहे. झिरो बेस्ड टाईमटेबलमध्ये वेळ मिळाल्यास माल गाड्यांमध्ये वाढ करण्यात येईल. तसेच, यावेळी पॅसेंजर रेल्वेगाड्यांची गतीही 10 टक्क्यांनी वाढू शकणार असल्याचा अंदाज, रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवळपास राहुल गांधीच निश्चित; सोनियांच्या बैठकीतून मोठा निर्णय?

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

(detail information of zero based timetable of indian railway)