देव दर्शन करुन प्रसन्न मनाने घरी येत होते पण वाटेतच…. कर्नाटकात घडली भयानक घटना

हे सर्व जण एकमेकांच्या जवळपासच्या गावात राहणार आहेत.

देव दर्शन करुन प्रसन्न मनाने घरी येत होते पण वाटेतच.... कर्नाटकात घडली भयानक घटना
| Updated on: Oct 16, 2022 | 3:59 PM

बंगळूरु : देव दर्शन करुन प्रसन्न मनाने घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. कर्नाटकात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व जण एकमेकांच्या जवळपासच्या गावात राहणार आहेत.

स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो आणि दुधाच्या टॅंकरची धडक होऊन भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की नऊ जण जागीच ठार झाले.

हा अपघात हासन जिल्ह्यातील अरासिकेरे तालुक्यातील गांधी नगरजवळ घडला. टेम्पोमध्ये एकूण 14 जण होते. हे सर्व जण जवळपासच्या गावात राहत होते. सर्व जण मिळून एका टेम्पोतून देव दर्शनाला गेले होते.

सुब्रह्मण्य आणि हसनंबे या देवस्थानांना यांनी भेट दिली. देव दर्शन झाल्यावर सर्व जण घरी परत येत असताना हा अपघात घडला.

शिवमोग्गाकडे जाणाऱ्या बसने भाविकांच्या टेम्पोला धडक दिली. त्यामुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडकला.

भाविकांचा टेम्पो बस आणि दुधाच्या टँकरमध्ये अडकला. यात नऊ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक आणि पोलिस यंत्रणा तात्काळ भाविकांच्या मदतीला धावून आले.

मृतांमध्ये दोन वर्षाच्या लहान मुलाचा देखील समावेश आहे. मृत भाविक हे सालापुरा आणि दोड्डीहल्ली गावातील रहिवासी आहेत.